उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांनी अवैध दारू विक्रेत्यास 3 महिन्या पर्यंतच्या कालावधीकरीता गोंदिया, जिल्ह्यातून केले हद्दपार…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया:
➡️ याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, पोलीस ठाणे दवणीवाडा परिसरातील मौजा-पीपरिया येथील सराईत अवैध दारू विक्रेता जाबदेणार – रामकिशोर जयराम शेंडे याचेविरुद्ध पोलीस ठाणे दवणीवाडा येथे अवैध दारू विक्री संबंधाने 8 गुन्हे दाखल असून त्याचे कृतीमुळे परीसरात भांडण-तंटे होत आहेत. पोलिसांनी त्याचेविरुद्ध वारंवार कारवाई करून सुध्दा त्याचेत सुधारणा झालेली नाही. सदर गुन्हेगाराच्या कृतीमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्याचे विरूद्ध पोलीस निरीक्षक, सतीश जाधव, पोलीस ठाणे दवनीवाडा यांनी त्यास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करणे करीता कलम 56(अ),(ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांचे कडे मंजुरीस्तव सादर केला होता, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांचे आदेशानुसार श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून सदर गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती.

या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधि कारी, तिरोडा श्रीमती पुजा गायकवाड यांनी दारू विक्रीचे गुन्हे करणारा सराईत अवैध दारू विक्रेता गुन्हेगार नामे - रामकिशोर जयराम शेंडे, वय 55 वर्षे रा. पीपरिया तालुका तीरोडा, जिल्हा गोंदिया यास गोंदिया, जिल्ह्यातून 3 महिन्यापर्यंतच्या कालावधी करीता गोंदिया जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दि.24/08/2023 ला पारीत केले आहे .
सदर दारू विक्री करणारा सराईत धंदेवाईक गुन्हेगारास हद्दपार आदेशा नुसार दिनांक-- 26/08/2023 रोजी आदेश तामील करून गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांनी केलेल्या हद्दपार कारवाईमुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून तिरोडा तालुक्यातील नागरिकांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे,
सदरची कारवाई मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. अशोक बनकर, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी यांच्या मार्गदर्श नाखाली करण्यात आली असून यापुढेही पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
अवैध कृत्य करणा-या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून तसेच अवैध धंदयापासून परावृत्त होवून ईतर वैध रोजगाराकडे वळण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com