उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांनी सराईत गुन्हेगारास 3 महिन्या पर्यंतच्या कालावधीकरीता गोंदिया जिल्ह्यातून केले हद्दपार…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, पोलीस ठाणे दवणीवाडा परिसरातील मौजा-बघोली  येथील सराईत गुन्हेगार जाबदेणार - दिलीप मनिराम अंबुले याचेविरुद्ध पोलीस ठाणे दवणीवाडा येथे अवैध दारू विक्रीचे गुन्हे अश्या विवीध प्रकारचे 23 गुन्हे दाखल असून सराईत गुन्हेगार हा सवयीचा मगरुर, धाडसी प्रवृत्तीचा आहे. याचे कृतीमुळे बघोली, परसवाडा, दवणीवाडा, तालुका तिरोडा, परीसरातील महिला, मुली व प्रतिष्ठीत सर्वसामान्य नागरिकांचे मनात दहशत निर्माण झालेली असून लोकांचे मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याने सर्व साधारण व्यक्ती त्याचे विरुद्ध उघड साक्ष देण्यास येत नाहीत . पोलिसांनी त्याचेविरुद्ध वारंवार कारवाई करून सुध्दा त्याचेत सुधारणा झालेली नाही. सदर गुन्हेगाराच्या कृतीमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्याचे विरूद्ध  पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे दवनीवाडा यांनी त्यास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करणे करीता कलम 56(अ),(ब)(महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांचे कडे मंजुरीस्तव सादर करण्यात आला होता,  उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांचे आदेशानुसार श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून सदर गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. 

             या अनुषंगाने  उपविभागीय अधिकारी  तथा उपविभागीय दंडाधि कारी, तिरोडा श्रीमती - पुजा गायकवाड, यांनी दारू विक्रीचे गुन्हे करणारा तसेच सदर जाबदेणार इसमाचे दारू विक्रीच्या धांद्यामुळे, कृत्यामुळे बाघोली, चांदोरी, परसवाडा, दवणीवाडा परिसरात खून, विनयभंग, शरीराविरूद्धचे विविध प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत. करीता सराईत धंदेवाईक गुन्हेगार नामे - दिलीप मनिराम अंबुले वय 55 वर्षे रा.बघोली, परसवाडा तालुका तीरोडा, जिल्हा गोंदिया  यास गोंदिया, जिल्ह्यातून 3 महिन्यापर्यंतच्या कालावधी करीता गोंदिया जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दि.18/08/2023 ला पारीत केले आहे .

        सदर दारू विक्री करणारा सराईत धंदेवाईक गुन्हेगारास हद्दपार आदेशा नुसार गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभा गीय दंडाधिकारी, तिरोडा यांनी केलेल्या हद्दपार कारवाईमुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून तिरोडा तालुक्यातील नागरिकांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे,

         सदरची कारवाई मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. अशोक बनकर, अपर पोलिस अधीक्षक गोंदिया, कॅम्प देवरी यांच्या मार्गदर्श नाखाली करण्यात आली असून यापुढेही पोलीस अधिक्षक गोंदिया, यांचे मार्गदर्शनात अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 

  अवैध कृत्य करणा-या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून तसेच अवैध धंदयापासून परावृत्त होवून ईतर रोजगाराकडे वळण्या चे आवाहन गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट