उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया सराईत गुन्हेगारास जिल्ह्यातून 2 महिन्याच्या कालावधी करीता केले हद्दपार..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :– पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, यांचे निर्देश मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलिसांची कारवाई;-

            ⏩ याबाबत थोडक्यात माहिती अशी की,पोलीस ठाणे गोंदिया शहर हद्दीतील जाब देणार सराईत गुन्हेगार ईसम नामे- प्रकाश उर्फ पप्पु हसनलाल टेंभरे वय 29 वर्षे, राहणार- छोटा गोंदिया, दत्त मंदिरचे मागे, तालुका,  जिल्हा - गोंदिया याचेविरुद्ध पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे दरोडा घालणे, जबरी चोरी करणे, भांडण करून जबर दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, जबरीने इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, खंडणी मागणे , खंडणी करीता अपहरण करणे, जबरीने अटकाव करणे, धमकी देणे, अश्याप्रकारचे गंभीर 15 गुन्हयांची नोंद असून गुन्हे दाखल आहेत..

            पोलीस ठाणे गोंदिया शहर पोलिसांनी नमूद सराईत गुन्हेगार जाब देणार विरुद्ध वारंवार  प्रतिबंधात्मक कारवाई करून, तसेच यापूर्वी 2016 ला एक वर्षांकरिता आणि 2019 मध्ये 6 महिण्याकरिता तडीपार करून सुध्दा त्याचे चारित्र्यात आणि सवयीत कसलीही सुधारणा झालेली नाही........ सदर गुन्हेगार हा सवयीचा मगरूर व धाडसी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात त्याचेविषयी दहशत निर्माण होवून त्याच्या गुन्हेगारी कृतीमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्याचेविरूद्ध पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे गोंदिया शहर यांनी गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करणेकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1),(अ),(ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव क्रं. 5/2023 प्रमाणे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचेकडे मंजुरीस्तव सादर केला होता...  

           उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचे आदेशानुसार श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा अतिरिक्त कार्यभार उपविभाग गोंदिया, यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून नमूद गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती..  

             या अनुषंगाने  उपविभागीय अधिकारी  तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया - यांनी नमूद सराईत गुन्हेगार  जाब देणार यास 2 महिन्याच्या कालावधी करीता गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिनांक- 09/02/2024 रोजी पारित केले आहे... सराईत गुन्हेगारास आदेश प्रत तामील करून गोंदिया जिल्ह्यातून 2 महिन्याच्या कालावधी करीता हद्दपार करण्यात आले आहे...

        गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया - पर्वणी पाटील, यांनी केलेल्या हद्दपार कारवाईमुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून पोलीस स्टेशन गोंदिया शहर  हद्दीतील छोटा गोंदिया, गोविंदपुर परिसरातील नागरिकांनी नमूद गुन्हेगारांवर केलेल्या हद्दपार कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे..

                 सदरची कारवाई मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा अतिरिक्त कार्यभार उपविभाग गोंदिया, श्री. प्रमोद मडामे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी आणि पोलीस पथक गोंदिया शहर यांनी केले असून यापुढेही पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात अवैध कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे... 

             अवैध कृत्य करणा-या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून तसेच अवैध धंदयापासून परावृत्त होवून ईतर वैध रोजगाराकडे वळण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट