उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अर्जुनी मोर, यांनी केशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील 5 गुन्हेगारांना गोंदिया जिल्ह्यातून 1 महिन्याच्या कालाधी करीता केले हद्दपार…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

➡️ याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, पोलीस ठाणे केशोरी परिसरातील येथील जाब देणार –
1) गणेश मुखरू कांबळे रा. प्रतापगड,

2) महेश मिश्रीलाल राठी रा. गोठनगाव

3) धनंजय संतोष राठी रा. गोठनगाव,

4) जितेंद्र तुळशीराम गजभिये रा. गोठनगाव

5)सिंधू जितेंद्र गजभिये रा. गोठनगाव

      याचेविरुद्ध पोलीस ठाणे केशोरी येथे अवैध दारू विक्री, भांडण तंटा, विनयभंग संबंधाने अनेक गुन्हे दाखल आहेत.

  पोलिसांनी त्याचेविरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्याचेत सुधारणा झालेली नाही. सदर गुन्हेगाराच्या कृतीमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने  त्याचे विरूद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक, सोमनाथ कदम पोलीस ठाणे केशोरी यांनी सर्वांना गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करणे करीता कलम 56(अ),(ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अर्जुनी मोर यांचे कडे मंजुरीस्तव सादर केला होता.  

      उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अर्जुनी मोर यांचे आदेशानुसार श्री. संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून सदर गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. 

         या अनुषंगाने  उपविभागीय अधिकारी  तथा उपविभागीय दंडाधिकारी, अर्जुनी मोर श्री. वरूनकुमार जनार्दन सहारे यांनी सर्व 5 जणांना 1 महिन्यापर्यंतच्या कालावधी करीता गोंदिया जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिलेले आहेत.

         गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अर्जुनी मोर यांनी केलेल्या हद्दपार कारवाईमुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून केशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे,

         सदरची कारवाई मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. अशोक बनकर, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


         यापुढेही पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात अवैद्य कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 

  अवैध कृत्य करणा-या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून तसेच अवैध धंदयापासून परावृत्त होवून ईतर वैध रोजगाराकडे वळण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट