नदी बंधाऱ्यात पाणी अडवण्याचे बर्गे चोरणाऱ्या दोघांना अटकविटा पोलिसांची कौतुकास्पद कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :– सांगली : जिल्ह्यातील चिखलहोळ येथील नदीचे बंधाराचे बाजूला असलेले पाणी अडविण्याचे लोखंडी बर्गे चोरणाऱ्या दोन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. फुलचंद पाटील (रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) अभिषेक सतीश कदम (वय १९ वर्ष रा. शेडगेवाडी, ता. खटाव, जि. सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ४०हजार रुपयांची एक काळ्या रंगाची हिरो के. ची स्लेंडर प्लस निळा, लाल व पांढरा पट्टा असलेली मोटरसायकल ( MH02HA0992), १४ हजार रुपयांचे पाणी अडविण्याचे १४ लोखंडी बर्गे, २ लाख रुपयांचा टाटा-२०७ चारचाकी पिकअप असा एकूण २ लाख ५४हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२६ फेब्रुवारी २०२३ चिखलहोळ येथील बंधाराच्या बाजुला ठेवलेल्या पाणी अडविण्यासाठीचे लोखंडी बर्गे चोरट्याने चोरी केले. या प्रकरणी पाठबंधारे खाते शाखाधिकारी अमितकुमार प्रकाश साठे यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुरनं ७५/२०२४ भा.दं.क. कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याच्या तपासासाठी विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान अंमलदार अक्षय जगदाळे यांना मायणी येथील दोन इसमांनी ही चोरी केल्याचे खबऱ्याने सांगितले. त्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा लावून आरोपी अजित फुलचंद पाटील (वय २१ वर्षे, रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा), अभिषेक सतीश कदम (वय १९ वर्षे रा. शेडगेवाडी, ता. खटाव, जि. सातारा) यांच्या मुसक्या आवळल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे, पोलीस अपर अधीक्षक रितू खोखर, उप विभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम माळी, हवालदार प्रमोद साखरपे, अंमलदार संभाजी सोनवणे, अमोल कराळे, हवालदार महेश देशमुख, अंमलदार अक्षय जगदाळे, हेमंत तांबेवाध, हवादार महेश संकपाळ, सायबर सेलचे श्रीधर बाग यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com