चिंचले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार हक्काचे छत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी घेतला पुढाकार..!
उपसंपादक : मंगेश उईके
डहाणू :-तालुक्यातील चिंचले येथील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतची जिल्हा परिषद शाळेची इमारत व एक अंगणवाडी ची इमारत मुंबई वडोदरा महामार्गात येत असल्याने महामार्ग बनवणाऱ्या कंपनीने जिल्हा परिषदेची कुठलीही पूर्व परवानगी न घेता तोडण्यात आली होती. त्यामुळे वर्षभरापासून या शाळेतील विद्यार्थी हे फक्त एका पत्राच्या छताखाली शिक्षण घेत होते. जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी वर्षभरापासून जिल्हा परिषदेमधील प्रत्येक स्थायी आणि सर्वसाधारण सभेमध्ये पोट तिडकीने हा विषय मांडला होता. नुकतच झालेल्या स्थायी समितीमध्ये देखील हा विषय काशिनाथ चौधरी यांच्याकडून मांडण्यात आला असून या सभेमधे मुलांना शाळा उपलब्ध करून न दिल्यास जिल्हा परिषद येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने आज दिनांक १०/१२/२०१४ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, मंगेश भोईर, शैलेश करमोडा, पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, डहाणू प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी, यांनी स्थळ पाहणी केली. यावेळी सदर महामार्ग बनवणाऱ्या कंपनीचे अधिकारी, देखील उपस्थित होते. शाळेच्या नवीन वर्ग खोल्या आणि अंगणवाडी बांधून देणे, त्यासाठी लागणारी किमान दहा गुंठे इतकी जागा व त्यासाठी लागणारा वाढीव खर्च हा अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या आदेशाने खास बाब म्हणून मंजूर करण्यात आली असून शाळा व अंगणवाडी चे काम जागा मालकाच्या संमतीने व काही प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर सुरू करण्यात येईल. ज्या जागी शेड होते त्याच जागेवर मुलांची शाळा आणि अंगणवाडी लवकरात लवकर उभारण्यात येईल. वर्षभर मुलांनी शेड मधे शिक्षण घेतले असून आता त्यांना हक्काची इमारत मिळणार असल्याने पालकांनी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.




यावेळी शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सदरील प्रकाराबाबत नियमित पाठपुरावा केल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी घटनास्थळी येऊन या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन हा प्रश्न सोडवल्याबाबत चिंचणी गावातील नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com