कुणबी भवन देवरुख येथे विद्यार्थी गुणगौरव संपन्न..

संपादिका- दिप्ती भोगल
देवरुख :-रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी कुणबी भवन देवरुख येथे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, देवरुख,आंबेड खुर्द संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मुंबई आयोजीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्रचंड उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
प्रथम महापुरुषांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक ठेवून उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला आणि दहावी बारावी डिग्री तसेच विशेष पदव्या घेतलेले खेळ यामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी खेळाडू यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पुस्तक तसेच विशेष भेट वस्तू देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचा गौरव सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम ग्रामीण शाखेचे अध्यक्ष भाऊ गीते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी तालुका शाखा मुंबईचे अध्यक्ष संजय गोंधळी मुंबई शिक्षण प्रसारक अध्यक्ष शंकर शिगवण देवरुखचे अध्यक्ष भाऊ कांगणे आंबेड खुर्दचे अध्यक्ष दत्ताराम लांबे तालुका संगमेश्वर कुणबी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष शांताराम सालप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे आणि तालुका संगमेश्वर कुणबी सहकारी पतपेढीचे माजी अध्यक्ष अविनाश लाड तसेच मुंबई शाखा ग्रामीण शाखा शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई ग्रामीण या संस्थांचे सरचिटणीस उपाध्यक्ष सहसचिव खजिनदार आणि संघाचे कार्यकारणी सदस्य प्रतिनिधी आणि प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थी गण समाज बांधव समाज भगिनी वरिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

या गुणगौरव सोहळ्यात आपल्या समाजातील इंजिनीयर डॉक्टर वैज्ञानिक खेळाडू यशस्वी होत आहेत आणि येणाऱ्या काळात आपल्या समाजातील उर्वरित जी क्षेत्र राहिलेले आहेत यश संपादन करतील असा विश्वास वाटतो आहे या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन करण्यासाठी ग्रामीण चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी केला.
चला तर मग आपल्या समाजाचे आपण सदस्य होऊ या समाजाला संघटित करूया आणि संघाच्या ध्येय उद्दिष्ट प्रमाणे सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक आर्थिक दृष्ट्या समाजाला उन्नततिकडे घेऊन जाऊया जय कुणबी
अशी माहिती श्री. सचिन रामाणे कुणबी युवा मुंबई प्रचार प्रमुख तालुका शाखा संगमेश्वर सहसचिव यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com