जुचंद्रमध्ये स्वराज्य प्रतिष्ठान यांचा विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी-राजेश घडवले
नायगांव :- बुधवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठिक साडेनऊ वाजता सह्याद्री शिक्षण सेवा मंडळ, जुचंद्र काॅलेज नायगाव येथे स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सोहळा प्रमुख मार्गदर्शक वसईचे तहसीलदार माननीय डाॅ.श्री. अविनाश कोष्टी तसेच नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. रमेश भामे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम पाटील, ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री. भोईर सर, ज्येष्ठ समाजसेवक श्री. विश्वजित पाटील तसेच प्राचार्य श्री. जगताप सर यांची उपस्थिती लाभली.

यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री गणेश फागे,भूपेंद्र विचारे,संदीप चव्हाण, मंगेश पवार, विजय दैत, नागेश यादव, पुना शेट्टी यांचे विशेष योगदान लाभले. आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com