शिरवळ पोलीस ठाणे यांची दमदार कामगीरी कॉपर चोरीचा गुन्हा दोन दिवसात उघड.. चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत टोळीतील ३ आरोपी सह चोरीचा माल विकत घेणारा अटक…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :-

       २/- शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीतील निसार ट्रान्सफॉर्मर प्रा. लि. या ट्रान्सफॉर्मर निर्मीती करणारे कंपनीत दिनांक १२/८/२०२३ रोजी रात्रीच्या वेळी ४ ते ५ चोरटयांनी प्रवेश करुन चोरी करुन कंपनीत नवीन ट्रान्सफॉर्मर्स तयार करण्यासाठी वापरले जाणारे तांब्याच्या तारा व पट्टया तसेच बॉबीचे बन्डल एकुण १० लाख ५८ हजार ४०० रु किंमतीचे सुमारे १५१२ किलो चोरुन घेऊन गेले बाबत फिर्यादीवरुन शिरवळ पोलीस ठाणे येथे घर फोडी चोरीचा गुन्हा दिनांक १४/०८/२०२३ रोजी दाखल करण्यात आला आहे.

        सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा व सदर गुन्हयातील चोरीस गेला माल किंमती असल्याने अनोळखी आरोपी यांचा शोध घेणे करीता वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी शिरवळ पोलीस ठाणे कडील अधिकारी श्री चिमाजी केंद्रे, पोलीस उप-निरिक्षक सतिश आंदेलवार, पोलीस उप-निरिक्षक शंकर पांगारे व अंमलदार सहा. पो. फौज अनिल बारेला, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुरेश मोरे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, पोकॉ मंगेश मोझर, अजित बोराटे, संग्राम भोईटे यांचे तपासपथके बनवुन तपासाचे मार्गदर्शन व सुचना दिल्या. वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनात शिरवळ पोलीस पथक यांनी वेगवेगळया ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन तसेच तांत्रीक व गोपनिय महितीच्या आधारे कोल्हापुर येथुन दोन संशयीतांना चौकशी साठी ताब्यात घेऊन विचारपुस केली. अटक करणेत आलेल्या आरोपी यांनी त्यांनी तसेच त्यांचे इतर साथीदार यांनी मिळुन कोल्हापुर येथून रात्रीच्यावेळी गुन्हा घडल्या ठिकाणी येऊन कंपनीतील कॉपर चोरुन कोल्हापुर येथे घेऊन गेल्याची कबुली दिली. सदर आरोपी यांचे कडुन पोलीस तपासात प्राप्त माहितीच्या आधारे गुन्हयात वापरलेले वाहन पीकअप व त्याचा चालक त्याच प्रमाणे गुन्हयातील चोरीस गेलेला माल विकत घेणारा यास ताब्यात घेणेत आले. त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला माल जप्त करणेत आला आहे. गुन्हयात वापरलेले वाहन पीकअप जीप व चोरीस गेलेला माल असा मिळुन सुमारे १३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.

        सदर कारवाई श्री. समीर शेख, पोलीस अधिक्षक सातारा, श्री. बापु बांगर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, व राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक नवनाथ मदने, सहा. पोलीस निरिक्षक चिमाजी केंद्रे, पोलीस उप-निरिक्षक सतिश आंदेलवार, पोलीस उप-निरिक्षक शंकर पांगारे, पोलीस उप- निरिक्षक अब्दुल बिद्री, सहा.पो.फौ. अनिल बारेला, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुरेश मोरे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, पोकों मंगेश मोझर, अजित बोराटे, संग्राम भोईटे यांच्या पथकाने केली आहे

अटक करणेत आलेले आरोपी :-

१) अविनाश दिपक मछले ऊर्फ कोकाटे वय २४ वर्ष

२) स्वप्नील महेश गारुंगे, वय २३ वर्ष
दोन्ही रा. ५५५/ ५५४ ए बी वार्ड, एस.एस.सी. बोर्डाजवळ, राजेंद्रनगर, शिवाजी युनिवर्सिटी कोल्हापुर ,ता. करवीर ,जि. कोल्हापुर

३) शिवाजी प्रभु तोरे वय ४२ वर्ष हल्ली रा. पिंटु शिखरे यांची खोली, साळुंके कॉलनी, भारतनगर कॉलनी कोल्हापुर मुळ रा. जिवळी ,ता. लोहारा ,जि. उस्मानाबाद.

४) विनायक बाळासो गोसावी वय ४२ वर्ष रा.गुटकेश्वर कॉलनी शिंगणापुर कोल्हापुर.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट