रिक्षा चोरी करणाऱ्या सराई चोरट्याला पोलिसांनी केले जेरबंद

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि २१ कल्याण ठाणे


कोळसेवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत दि१८ रोजी रात्रीच्या वेळी, जिम्मी बाग, कर्पेवाडी कल्याण पुर्व येथे फिर्यादी नाव राजेश देवीदयाल मेहुलीया वय ४६ वर्षे, काम रिक्षा चालक राह. जय श्रीहरी सोसा चाळ न १, रूम नं ८, जिम्मी बाग, कर्पेवाडी कल्याण पुर्व यांची रहाते घरासमोर पार्क केलेली रिक्षा ही अज्ञात इसमाने चोरी करून नेली म्हणुन कोळसेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३१४/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दि. २०/०४/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आले.
सदर दाखल गुन्हयाचे तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक माहीती व गुप्त बातमीदारांमार्फत माहीती काढून कौशल्यपुर्ण तपास करून अनोळखी आरोपी निष्पन्न करून रेकॉर्डवरील आरोपी प्रांजल मनोज बर्वे, वय २६ वर्षे, राह. रूम नं १५, योगेश अर्पा, करपे वाडी, न्यु जिम्मी बाग, कल्याण पुर्व यास चोरी केलेल्या रिक्षा सह शिताफीने पकडून दि. २१ रोजी अटक केली व त्याचेकडून गुन्हयातील चोरी केलेले ६५,०००/- रू. किमतीची MH-05-CG-8672 रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण अतुल झेंडे, व सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांचे मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणेचे वपोनिरी. गणेश न्हायदे, सहा.पो.निरी. दर्शन पाटील, सहा.पो.निरी. संदीप भालेराव, पोहवा/४२० बुधवंत, पोहवा /२१५ जाधव, पोहवा/१४७१ भामरे, पोहवा/५०३वाघ, पोहवा / ३११२ सौंदाणे, पोहवा/६५९६जरग, पोहवा/६२५६कापडी, पोशि/ २६५६ सोनवळे, पोशि/२१३७ सोनवणे यांचे पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट