एटीएम मनी डिस्पेंस पट्टी तोडून एटीएम मधील रोख रक्कम चोरी करणा-या जि.प्रतापगढ,उत्तर प्रदेश येथील टोळीस अटक करुन 4 गुन्हे उघडकीस…
उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली : ➡️ एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे गु. र. क्र. 109/2023 कलम 379, 427, 511 भादवी
➡️ *गुन्हा घडला – दिनांक 08/03/2023 रोजी 10.50 ते 15.30 वा. पर्यंत
➡️ गुन्हा दाखल: दि.08/03/2023 रोजी 20.04 वाजता
➡️ फिर्यादी नाव व पत्ता: श्री. जॉय जोसेफ फरगोज, वय -30 वर्ष धंदा- नोकरी (सहाय्यक व्यवस्थापक बीसीसी बँक) राठी- आश्रय लहान सरगोडी,गास पो. सोपारा, तालुका- वसई, जिल्हा- पालघर.
➡️ घटनास्थळ: बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक, भगवती हॉस्पिटलच्या बाजूला.
बोरिवली पश्चिम, मुंबई
➡️ हकीकत:
दिनांक 05/03/2023 रोजी 14.50ते 15.30 वाजेच्या दरम्यान बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम भगवती हॉस्पिटल जवळ बोरवली पश्चिम या ठिकाणी दोन अनोळखी इसम एटीएम मध्ये आले व त्यांनी स्क्रू ड्रायव्हर सारख्या हत्याराने मशीनमध्ये छेडछाड केले आणि एटीएम रूमच्या बाहेर जाऊन थांबले काही वेळाने बँकेचा एक ग्राहक एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आला व त्याचे पैसे मशीन मधून न मिळाल्याने तो निघून गेला त्यानंतर बाहेर थांबलेले हे दोन इसम पुन्हा आत मध्ये येऊन एटीएम मशीनच्या कॅश विड्रॉलच्या ठिकाणी हात घालून त्यातील बेल्ट हाताने खेचून काढला आणि मशीनच्या आत मोबाईल टॉर्च च्या प्रकाशात पैसे आले की नाही याची खात्री केली व एटीएम मशीनचे नुकसान करून चोरी करण्याचा प्रयत्न करून पळून गेले.

➡️ तपास –
एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार व पथक यांनी सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल तांत्रिक केले असता यातील आरोपीत इसम हे सुट्टीच्या दिवशी डोंबिवली, नवी मुंबई ,मिरा रोड,नालासोपारा या ठिकाणी चोरी केलेल्याचे व गुन्हा केल्यावर जिल्हा प्रतापगड,उत्तर प्रदेश या ठिकाणी जात असल्याचे दिसून आले.

त्यावरून नमूद आरोपीतांंचे मोबाईलचे विश्लेषण सतत केले असता आरोपीत इसमांचे लोकेशन दिनांक 02/04/23 रोजी जय भीम नगर, कळवा, जिल्हा ठाणे येथे असल्याचे मिळाले.
त्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार शिंदे,पोलीस हवालदार खोत,पोलीस नाईक देवकर पोलीस शिपाई मोरे, पोलीस शिपाई सवळी तसेच पोलीस शिपाई हरमाळे यांचे सह नमूद ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर आरोपीचे घर हे पत्र्याच्या झोपडीत होते. त्यावेळी झोपडीस चारही बाजूने घेरले असता यातील आरोपीचे इसम हे पत्रा तोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
➡️ अटक आरोपी:
1- धीरेंद्रकुमार रामदेव पाल,
वय- 22 वर्ष, रा.ठि – कुंडा गाव,प्रतापगड,उत्तर प्रदेश
गुन्हे अभिलेख:-
दिवा पोलीस ठाणे 1 गुन्हा
- अभिषेक रामअजोर यादव,
वय 22 वर्ष, रा.ठि – कुंडा गाव,प्रतापगड,उत्तर प्रदेश
➡️ आरोपी अटक
दि.04/04/2023
रोजी 20.52वाजता.
उघडकीस आलेले गुन्हे :-
MHB Police Stn
1) 109/23,Us 379,427,511 IPC
2) 156/23, Us 380,427,34 IPC
Tilak Nagar PS
3) 158/23, Us 380,427,34 IPC
Tulinj PS,Mira bhayander
4) 130/23, Us 380,427,34 IPC
आरोपितांनी चोरी केलेली ठिकाणे
1) 08/02/2023 रोजी नालासोपारा येथे एकुण 6 बँकेचे एटीएम
2) 23/02/2023 रोजी चेंबुुर येथे एकुण 5 बँकेचे एटीएम
3) 05/03/2023 रोजी एम.एच.बी,दहिसर येथे एकुण 5 बँकेचे एटीएम
4) 03/03/2023 रोजी डोंबिवली येथे एकुण 5 बँकेचे एटीएम
एकुण 21 एटीएम
➡️ तपास मार्गदर्शन
1) श्री. सुधीर कुडाळकर वपोनि
एम एस बी कॉलनी पोलीस
ठाणे
2) श्री. सचिन शिंदे पोनि/
गुन्हे एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे.
➡️ तपास पथक:
सपोनि सूर्यकांत पवार
पोहवा/963131/ शिंदे
पोहवा/980725/खोत
पोना/ 060799/ देवकर
पो.शि. क्र /111518/ सवळी
पो.शि. क्र /130299/ शेरमाळे
पो.शि. क्र/ 140340/मोरे
म.पो.शि रुपाली डाईंगडे ( परि.11 तांत्रिक मदत)
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com