दारु पिऊन नुकसान करण्यापेक्षा दूध पिऊन तंदुरुस्त रहा..!

0
Spread the love

पुणे :

उपसंपादक-उमेद सुतार

नूतन वर्षाचे स्वागत तरुणांकडून व्यसनाच्या आहारीष जाऊन केलं जात अशात तरुणांनी व्यसना पासून दूर राहावं या हेतूने हा उपक्रम राबवण्याचे संस्थेकडून ठरविण्यात आले. व्यसनमुक्ती च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत नववर्षाचे स्वागत दूध पिऊन साजरा करावे व सामाजिक जाणिव जपली जावी म्हणून ३१ डिसेंबर २०२४ सायंकाळी ७ वाजल्यापासून दूध वाटप करण्यात आले.

या प्रसंगी पीसकीपर्स वेलफेयर फाउंडेशन (शान्तिरक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र) संस्थापक उमेदाराम सुथार , आबेंगाव पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरिक्षक शरद झीने,सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर, नीलिमा जाधव, अमर भौसले, अविनाश रेवे, आबेगांव वाहतूक विभागचे महेश, श्रद्धा यादव,शान्तिरक्षक कल्याण संस्थानचे पुणे शहर सचिव शेखर पवार, सदस्य जगदीश हलकुडे, व इतर पोलीस स्टाप, समाजसेवक शकरराव बेलदरे, ताराचंद,ओमप्रकाश, धर्मेंश सुथार उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट