धारदार शस्त्राने वार करुन पळुन जाणाऱ्या आरोपीस अवघ्या ४तासात अटक करणाऱ्यांचा मा.सह.पोलीस आयुक्त का. व सु. तर्फे विशेष सत्कार..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:-दिनांक ०८/०३/२०२४ रोजी पहाटे ०४:३० वाजेच्या सुमारास टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत भिमसेन देवचंद भालेराव, वय ३५ वर्षे यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला, म्हणुन अज्ञात आरोपीताविरोधात कलम ३०२ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाच्या तपासकामी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, मुंबई श्री हेमराजसिंह राजपूत व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, टिळकनगर पोलीस ठाणे श्री दिपक बागुल यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस पथके तयार करण्यात आली.

सदर पथकाने गुप्त बातमीदारांकडून तसेच तांत्रिक तपासाचे आधारे कौशल्यपुर्ण तपास करीत आरोपी नामे रोहीत दिपक खर्षे, वय – २९ वर्षे यास ताब्यात घेतले.

तपासादरम्यान त्याने मयत इसम व यांचेमध्ये झालेल्या वादातून आरोपी याने वार करून निघृण हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि राजदत्त कांबळे करीत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री विनायक देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, श्री हेमराजसिंह राजपूत, टिळकनगर पोलीस ठाणेचे वपोनि श्री. दिपक बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे (गुन्हे), पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील, सपोनि राहुल वाघमारे, पोउनि संदिप पवार, पोउनि विजयसिंह देशमुख, पोउनि आत्माराम राठोड, पोउनि शिवाजी काकडे, मपोउनि पौर्णिमा हांडे, मपोउनि पल्लवी शिसोदे, पोह सुनिल पाटील, पोह संजय शिंदे, पोह संदिप गर्जे, पोह सत्यवान साठेलकर, पोह सोमनाथ पोमणे, पोशि रोहीत फरांदे, पोशि समिर पिंजारी, पोशि गणेश गायकवाड, पोशि भारत नागरगोजे, पोशि दर्शन कोकाटे, पोशि मनोज कडव, पोशि उमेश कटके यांनी यशस्वारित्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट