माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या राजापूर तालुका सहप्रचार प्रमुखपदी श्री सुशिल जानू तांबे यांची विशेष निवड..

संपादिका- दिप्ती भोगल
राजापूर :-माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या ,महासंघाच्या रत्नागिरी ,राजापूर तालुका सह प्रचार प्रमुख पदी श्री सुशिल जानू तांबे यांची निवड करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती ही दि.२० जून २०२४ पासून पुढील ३ वर्षे किंव्हा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील.
सदर दिलेले पद मानद स्वरूपाचे असून भारतीय सविंधान,भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे.
सदर पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करावा.तसेच सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रचार व प्रसार करावा अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.


श्री सुशिल जानू तांबे यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर यांनी निवडीचे पत्र दिले व श्री सुशिल तांबे यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या .
तसेच श्री सुशिल जानू तांबे हे राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असून साई सेवा प्रतिष्ठानचे ते संस्थापक / अध्यक्ष देखील आहेत. तसेच ते सुरक्षा पोलीस टाइम्सचे राजापूर प्रतिनिधी देखील आहेत त्यांच्या या राजकीय व सामाजिक कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा..!
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com