वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे अंतर्गत प्रवाशी, महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत विशेष जनजागृती…

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

वसई :

वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे अंतर्गत रेल्वे प्रवासी व महिलाच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अनघा सातावसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात आली.

दिनांक 09/11/2024 रोजी 18: 10 वा.ते 18 : 35 वा.पर्यंत Commuting Policing अंतर्गत वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील वसई रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 2 वर महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने पॅम्प्लेटचे वाटप करून तसेच खालील प्रमाणे सुचना देऊन जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमावेळी खाकितील सखी व कोटो ॲप बाबत तसेच बाल हक्क जनजागृती वाढविण्याकरिता बाल न्याय अधिनियम 2015 बाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आहे.

1) मा. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांचे खाकीतील सखी या संकल्पनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.मोबाईल फोन चोरी, किंमती व मौल्यवान वस्तू चोरी इ. गुन्ह्यांबाबत उपस्थित रेल्वे प्रवासी नागरीक व महिला प्रवासी यांना प्रबोधन करण्यात आले.

2) महिलांच्या सुरक्षेकरीता रात्रीच्या व पहाटेच्या वेळी महिलांकरीता राखीव डब्यांमध्ये रेल्वे पोलीसांकडुन सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

3) महिला प्रवाशांनी महिलांकरीता राखीव असलेल्या डब्यातुन प्रवास करावा.

4) महिलांनी एकटे राखीव डब्यातुन प्रवास करतांना सुरक्षा कर्मचारी डब्यामध्ये आहे यांची खात्री करावी. सुरक्षा कर्मचारी नसल्यास, प्रवाशी असलेल्या डब्यातुन प्रवास करावा.

5) रेल्वे स्टेशन अथवा रेल्वे प्रवासात कोणत्याही प्रकारची छेडछाडीची घटना होत असल्यास त्याची माहिती तात्काळ कर्तव्यावरील पोलीस अंमलदार अथवा रेल्वे पोलीस हेल्पलाईन क्र. 1512 यांना कळवावी.

6) लोकल गाडयांमध्ये चढतांना अथवा उतरतांना व प्रवासादरम्यान आपला मोबाईल, सॅगबॅग व इतर मौल्यवान चिजवस्तुंवर लक्ष द्यावे.

7) लोकल मध्ये चढतांना अथवा उतरतांना आपल्या जवळील सॅगबॅग पाठीवर न लावता समोर धरावी जेणेकरुन चोरांना चोरी करण्याची संधी मिळणार नाही.

08) प्रवासादरम्यान दरवाजात लटकुन प्रवास करु नये त्यामुळे जिवीतास तसेच मालमत्तेस धोका होऊ शकतो.

09) दिवाळीच्या अनुषंगाने गाडीमध्ये कोणीही फटाके घेऊन जाऊ नये जेणेकरून काही हानी होऊ शकते.

10) बाल न्याय अधिनियम 2015 बाबत वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेले युट्युब लिंक बाबत माहिती दिली.

11) अमली पदार्थ व्यसनाचे दुष्परिणाम या विषयाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची समज देण्यात आली.

12) पोक्सो कायदा 2012 विषयी माहिती दिली ..18 वर्षाखालील लहान मुली किंवा मुले याच्यावर हो

सदर कार्यक्रमावेळी आमच्या मार्गदर्शना खाली आम्ही स्वतः, वपोनि. सातवसे खाकितील सखी 03 महिला पोलीस अंमलदार ,पोउपनि. खैरणार,02 MSF,तसेच 25 ते 30 महीला प्रवासी असे हजर होते.णाऱ्या अत्याचार बाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट