अमूल्य मतदान करणाऱ्या मतदाराला जागृती गृह निर्माण संस्थेकडून विशेष पारितोषिक वितरण..

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित महामुलकर

सांताक्रूझ :-दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईत होणाऱ्या १५ व्या विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी आपले अमूल्य मतदान करून आपला अधिकार बजवावा व आपल्याला अभिप्रेत असलेला उमेदवार निवडावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सांताक्रूझ पुर्व येथील जागृती गृह निर्माण संस्थेने एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे.

यावेळी मतदान करणाऱ्या मतदार राजाला ३ प्रकारचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहेत.

यातील प्रथम पारितोषिक १ एलईडी टीवी १ नग , द्वितीय पारितोषिक एअर फ्रायर ३ नग तर तृतीय पारितोषिक म्हणून एकुण ५ डिनर सेटची व्यवस्था करण्यात आली आहे.

तरी सर्व सभासदानी आपले अमूल्य मतदान करावे आणि ह्या लकी ड्रॉचा फायदा घ्यावा असे निवेदन करण्यात आले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट