मा. उप-राष्ट्रपती, भारत सरकार यांचा गोंदिया जिल्हा दौरा प्रसंगी पोलीस बंदोबस्ताचे विशेष नियोजन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

         दिनांक- 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.30  वाजता डी. बी. सायन्स कॉलेज, गोंदिया येथे शिक्षण महर्षी स्वर्गीय  मनोहरभाई पटेल, यांचे 118 व्या जयंती समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे... याप्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदक वितरण करण्यात येवून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे...... त्यानंतर दुपारी 1.00 वाजता स्थळ :- दासगांव रोड, मौजा- कुडवा, गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया चे मा. महोदय यांचे शुभहस्ते भूमिपूजन  सोहळा पार पाडण्यात येणार आहे....

         मा. श्री. जगदीप धनखड़, उप-राष्ट्रपती, भारत सरकार, यांचे शुभ हस्ते पार पाडण्यात येणाऱ्या कार्यक्रम गोंदिया जिल्हा दौरा प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल, मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री, पालकमंत्री महाराष्ट्र राज्य, आणि ईतर मान्यवर मंत्री महोदय, खासदार, आमदार आणि गोंदिया- भंडारा जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक, जनसमुदाय मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थीत राहणार आहेत.

         अतिमहत्वाच्या व्यक्ती दौरा प्रसंगी  सुरक्षेच्या दृष्टीने मा. पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, कॅम्प नागपूर यांचे आदेशान्वये सदर दौरा कार्यक्रमा दरम्यान सर्व राजशिष्टाचाराचे पालन व कायद्या सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख  पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करणे अति आवश्यक असल्याने पोलीस आधिक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांचे संपुर्ण नियंत्रणात आणि देखरेखीखाली, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली देशातील अति महत्वाचे व्यक्तींचे संरक्षण कायदा सुव्यवस्था सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे..

तैनात पोलीस बंदोबस्त रूपरेषा–
➖➖➖➖➖➖➖➖➖
एकूण संख्याबळ-

  1. बाहेर जिल्हयातील एकूण पोलीस अंमलदार- 700
  2. बाहेर जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकारी एकूण – 4 S.P. दर्जाचे, 8 DySP दर्जाचे, 11 पोलीस निरीक्षक, 60 स.पो.नि/ पो.उप.नि
  3. बाहेर जिल्ह्यांतील राज्य राखीव दलाचे – 1 कंपनी
  4. गोंदिया जिल्हा पोलीस दलातील एकूण पोलीस अंमलदार – 800
  5. गोंदिया जिल्हा पोलीस दलातील एकूण पोलीस अधिकारी – 70
  6. गोंदिया जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी – अपर पोलीस अधीक्षक- 1, DySP – 3
  7. एकूण स्वांन पथके (dog squad) – 4 टीम
  8. एकूण बॉम्ब शोध व नाशक पथके (bdds )- 8 टीम अश्याप्रकारे अति महत्त्वाच्या व्यक्तींचे सुरक्षिततेचे अनुषंगाने पोलीस बंदोबस्ताची विभागणी करण्यात आलेली असून बिर्सी विमानतळ, डी. बि सायन्स कॉलेज सभा स्थळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भूमिपूजन सोहळा कार्यक्रम स्थळ कुडवा, एम आय ई.टी. कॉलेज, रोड पॉईंट बंदोबस्त, याप्रमाणे बंदोबस्ताची विभागणी क्रमाप्रमाणे अधिकारी व अंमलदार यांना नेमण्यात येवून अतीमहत्वाचे व्यक्तींचे सुरक्षिततेच्या दृ्टीकोनातून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट