जगन्नाथ तांडेल यांच्या स्मरणार्थ शिवसेना शाखा जुचंद्र व परेरा नगर तर्फे दहीहंडीचे महिलांसाठी स्पेशल आयोजन…

संपादिका – दिप्ती भोगल
नायगाव :-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना शाखा जुचंद्र व परेरा नगर शाखेतर्फे तसेच धार्मिक सेवा मंडळ जुचंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सन्माननीय श्री जगन्नाथ तांडेल यांच्या स्मरणार्थ ह्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.








यावेळी महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात एक अती उल्लेखनीय असा संदेश देण्यात आला होता.
यावेळी “फक्त महिलांसाठी , राक्षसाला फोडा ” तसेच “स्त्री ही स्वराज्याच्या देव्हारयातील देवता आहे तिचे रक्षण झालेच पाहीजे ” असे संदेश महिला संरक्षणार्थ देण्यात आले होते.
यावेळी दहीहंडी फोडण्याचा मान महिला गोविंदा पथकाला देण्यात आला आणि मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जुचंद्र शाखा व परेरा नगर शाखेच्या महिलांनी थर लावून सलामी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com