स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत विशेष मोहीम

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

सांगली

महात्मा गांधी पो. ठाणे हद्दीत नशेच्या गोळयांची अवैध विक्री करणारे इसमांस सापळा लावून अटक, ८९० नशेच्या गोळया हस्तगत, एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे कारवाई

पोलीस स्टेशन

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे

गु.र.नं.४२/२०२५

गु.प.ता वेळ

२३.०२.२०२५ रोजी १४.१५ वा

अपराध क्र आणि फलम

एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (ग), २२ (क) व सींदर्य प्रसाधने अधिनियम १९४० चे कलम १८ (सी) प्रमाणे

गु.दा.ता येळ

२३.०२.२०२३ रोजी

फिर्यादी नाव

अतुल बसंत माने पोहेकॉ/१७२८ नेम- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली.

माहिती कशी प्राप्त झाली

गोपनीय बातमीदारामार्फत

पोहेकों/अमोल ऐदाळे, अतुल माने

कारवाई करणारे अधिकारी आणि अमंलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप पुगे,

मा. अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर

पोलीस निरीक्षक सतीश शिंदे

औषध निरीक्षक राहूल करंडे

यांचे मार्गदर्शनाखाली

१) सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत २) सहा. पोलीस निरीक्षक जयदीप केळकर,

अमोल ऐदाळे, बाबासाहेब माने, बसवराज शिरगुप्पी, इम्रान मुल्ला, संकेत मगदूम, अतुल माने, आमसिध्द खोत, सागर लवटे, रणजीत जाधव, रोहन घरते, गणेश शिंदे

आरोपी ताब्यात वेळ दिनांक

२३.०२.२०२५

०१ अटक आरोपीची नावे व पत्ता

१) जुनेद शब्धीर शेख वय-३१ वर्षे राहणार-हंगड गल्ली, बुधवार पेठ, मिरज ता-मिरज जि-सांगली

जप्त मुद्देमाल

एकुण १८,०००/- रु. किमतीच्या ८९० नशेच्या गोळ्या
गुन्हयाची थोडक्यात हकीकत

सांगली जिल्हयाचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा नशामुक्त अभियान सुरु केले आहे. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक संदीप पुगे यांनी मानवी जीवनावर परिणाम करणा-या अंमली पदार्याची विक्री, तस्करी, साठा प उत्पादन करणारे इसमाचे यायत माहीती काढून त्यांचेवर कारवाई करणेयायत आदेशीत केले आहे.

मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली व मा. जिल्हाधिकारी, सांगली व मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांचे उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे दर आठवडधात नशामुक्त भारत अभियान टास्क फोर्सची बैठक होत असते. सदर बैठकीमध्ये जिल्हयात होणा-या बेकायदेशीर नशेच्या गोळया विक्रीवर प्रतिबंध करणे अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन अधिकारी व कर्मचारी, केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन सांगली जिल्हा, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विशेष सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे आम्ही सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर व वरील अंमलदार यांचे पथकास वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे विशेष मोहिम रायपून अवैध व घेकायदेशीर नशेच्या गोळया विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सपोनि नितीन सार्यत, जयदीप कळेकर व त्यांचे सोचत असणारे अंमलदार है मिरज विभागात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत अवैध व बेकादेशीर नशेच्या गोळ्या चाळगणारे, विक्री करणारे इसमांबायत माहिती घेत असताना, पोहेकों/अमोल ऐदाळे व अतुल माने यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जुनेद शेख हा मिरज मार्केट यार्ड परिसर येथे नशेच्या गोळ्या विक्री करीता घेवून येणार आहे अशी खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त झाली. मिळाले गोपनीय माहिती यायत वरिष्ठांचे परवानगीने नमुद पथकाने पंच, औषध निरीक्षक अधिकारी राहुल फारंडे व स्टाफसह मिरज मार्केट यार्ड परिसर येथे जावून पाहणी केली असता, सदर चातमीतील नमूद ठिकाणी ०१ इसम हा त्याचे हातात पांढऱ्या रंगाची प्लॅस्टीकची पिशवी घेवून संशयीत रित्या जात असताना दिसून आला. त्याचा बातमी प्रमाणे संशय आल्याने, नमूद इसमांस पळून जाणेची संधी न देता त्यांस जागीच पकडले. तसेच सदर इसमांस पोलीसांनी आपली ओळख सांगून त्यांस त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्यांचे नाव जुनेद शब्चीर शेख, बच-३१ वर्षे, राहणार-हंगड गल्ली, बुधवार पेठ, मिरज, ता-मिरज, जि-सांगली असे सांगितले. त्याचे कब्जात असलेल्या पांढ-या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये एकुण १८,०००/- रु. किंमतीच्या ८९० नशेच्या गोळ्या मिळून आल्या आहेत.

जुनेद शब्बीर शेख यास कमात मिळून आलेला औषधी साठा हा डॉक्टरांचे सल्ल्याविना विनाकारण घेतल्यास तो मानवी जिवीतारा व शरीरास अपायकारक आहे. सदर औषधांमुळे मानवी मेंदुवर गुंगिकारक परिणाम होतात असे औषध निरीक्षक राहुल करंडे यांनी समक्ष सांगितले. जुनेद शब्बीर शेख याचेकडे मिळून आलेल्या औषधी साठयावाचत त्याचेकडे बील / परवाना / डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन नसल्याची खात्री झाल्याने, सपोनि/नितीन सावंत, जयदीप कळेकर यांनी नमुद औषध साठा हा त्याने कशाकरीता बाळगला आहे याचायत विचारणा केली असता, त्याने सदरची औषधे ही नशा करणारे इसमांना जादा दराने विक्री करणेकरीता बाळगली आहे असे सांगितले. जुनेद शब्वीर शेख यांस सदरचा औषध साठा कोठून आणला यावाचत विचारणा केली असता, त्याने सदरच्या गोळया हया तो फाम असलेल्या मिरज येथील वडगांवकर हॉस्पीटलचे मेडीकल मधून कोणास काही एक न सांगता, गुपचूप घेतल्या असल्याची त्यानी कबुली देवून सदरच्या गोळ्या नशा करण्यासाठी चढ्या दराने विक्री करण्यासाठी आणल्या असलेचे सांगीतले.

सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपी यांस पुढील कारवाई कामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आलेले आहे. गुन्हयाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत.

जिल्हयात नशेसाठी अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळ्या व इंजेक्शन विक्री, व्यापार करणारेय इसमांवर प्रभावी कारवाई करण्याची सदरची मोहिम चालु ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट