आगामी लोकसभा ननिवडणुकीत अवैध धंदे तसेच जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष सुचना…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:– आगामी लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांची बैठक घेऊन अवैध धंदे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेच्या अनुषंगाने योग्य त्या कारवाया करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने बोईसर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोनि/शिरीष पवार यांना मौजे बोईसर, दांडीपाडा, लोखंडीपाडयाचे पुढे, वाघरी वस्ती, बोईसर, ता. जि. पालघर येथे एक इसम विनापरवाना, अवैधरित्या अग्निशस्त्रे व घातक हत्यारे आपले कब्जात बाळगत असल्याची गोपणीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/शिरीष पवार, प्रभारी अधिकारी, बोईसर पोलीस ठाणे यांनी पोउपनि/विठ्ठल मनिकेरी यांचे एक पथक तयार केले. सदर पथकाने दि.२८/०३/२०२४ रोजी दुपारी १२.४० वाजता चे सुमारास वरील नमूद ठिकाणी छापा टाकून आरोपी दिपक सवाभाऊ पवार, वय ५५ वर्षे, रा. दांडीपाडा पैकी लोखंडीपाडयाचे पुढे याघरी चाळ, बोईसर, ता.जि. पालघर याचे राहते घराची झडती घेतली असता तो खालील नमूद वर्णनाचे अग्निशस्त्रे व घातक हत्यारे विनापरवाना, अवैधरित्या बाळगत असल्याचे मिळून आले.
१) १०,०००/-रु. किंमतीचे लोखंडी नळी, लोखंडी बट आणि त्यास लाकडी नक्षीची मुठ असेलेले देशी गावठी बनावटीचे पिस्तुल.
२) २,०००/-रु. किंमतीचे दोन जिवंत काडतुस, त्याचे पुढील राखाडी रंग व तांब्यांची रंगाची नळी, सदरची ही एका पितळी नळी मध्ये दिसत आहे. पितळी नळीचे मागील गोलाकार बाजुस इंग्रजी अक्षरामध्ये BMM च KF असे लिहिलेले.
३) ३००/-रु. किंमतीचा लोखंडी कोयता, त्यास ४ इंच लांबीची व १ इंच रुंदीचा लोखंडी कोयता.
४) ३००/-रू. किंमतीचा लोखंडी सुरा, त्यास ४ इंच लांबीची व १ इंच व्यासाची लाकडी मुठ, १० इंच लांबीचा व १ इंच रुंदीचा लोखंडी सुरा.
५) ५००/-रू. किंमतीचा लोखंडी मोठा कोयता, त्यास ५ इंच लांबीची व १ इंच व्यासाची लोखंडी मुठ १७ इंच लांबीचा व २ इंच रुंदीचा लोखंडी निमुळता कोयता. असा एकूण १३,१००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमूद आरोपीस अटक करण्यात आले असून त्याचेविरूध्द बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १३८/२०२४ भारतीय हत्यार अधिनियम क. ३,४ व २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा पोनि/शिरीष पवार, प्रभारी अधिकारी, बोईसर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सफौ/सुरेश दुसाने, नेमणुक बोईसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि/शिरीष पवार, प्रभारी अधिकारी, बोईसर पोलीस ठाणे, पोउपनि/विठ्ठल मनिकेरी, पोउपनि /सुरेश कोकाटे, सफौ/सुरेश दुसाने, सफौ/धवळू मोंढे, पोहवा/विजय दुबळा, पोहवा/संदिप पाटील, पोहवा/रोहिदास माडी, पोहवा/विलास माळी, पोहवा/निलेश पाटील, पोना/रमेश पालवे, पोना/ योगेश गावीत, पोना/प्रविण भोईर, पोना/रामचंद्र आव्हाड, पोशि/देवेंद्र पाटील, पोशि/धिरज साळुंखे, पोशि/मच्छिंद्र घुगे, पोशि/सागर जाधव, मपोशि/सारीका डोंगरे, मपोशि/सरीता जाधव चालक पोशि/पराग भगत यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com