नालंदा अभ्यास केंद्रातर्फे विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार व मार्गदर्शन..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-नालंदा अभ्यास केंद्राचे विद्यार्थी कू.नम्रता ज्ञानदेव मस्के,सहायक राज्यकर आयुक्त,फत्तेसिंग गायकवाड,उप अग्निशमन अधिकारी,पनवेल महानगर पालिका,प्रसाद मस्के,वनरक्षक ठाणे, व सर्वेश पोतदार,आर्मी टेक्निकल पदी निवड झाल्याबद्दल मंगरूळ गावचे पैलवान विकास पाटील यांनी मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा जिंकल्याबद्दल तसेच नालंदा अभ्यास केंद्राचे आधारस्तंभ ग्रामीण कथा कथनकार बाबासाहेब परिट यांची अखिल भारतीय साहित्य अकादमी तर्फे कथा कथन करिता निवड झाल्याबद्दल या सर्वांचा सत्कार नालंदा अभ्यास केंद्राच्या वतीने करण्यात आला.

यावेळी नालंदा अभ्यास केंद्राचे संस्थापक श्री दिपक कांबळे,तसेच माझी प्रा.शालन पाटील मॅडम,निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक आणि नालंदा अभ्यास केंद्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमची सुरुवात बुद्द,बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा वंदन करून झाली.विविध पदासाठी निवड झालेल्या विध्यर्थेनी आपल्या मनोगतात नालंदा अभ्यास केंद्र तसेच अभ्यास केंद्राचे संस्थापक दिपक कांबळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या सोई सुविधांचा उल्लेख करून त्यांचे मनापासून आभार मानले.ज्याप्रमाणे दिपक कांबळे यांनी गरिबीची जन ठेवून आमच्या सारख्या गरीब,होतकरू मुलांना नालंदा अभ्यास केंद्राच्या माध्यमातून विना मूल्य सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे आम्ही आज यशस्वी झालो.याची जाण ठेवून आम्ही देखील नालंदा अभ्यास केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब होतकरू मुलांना साह्य करू अशी गवाही दिली.

कार्यक्रमाचे नियोजन अभ्यास केंद्राचे कार्यवाहक आकाश आढाव ,प्रास्ताविक अभय कुंभार तर सूत्र संचालन संचीता कुंभार व आभार प्रदर्शन विराज शिंदे या विद्यार्थ्यांनी केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट