जिल्हा परिषद पालघर येथे महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना विशेष मार्गदर्शन..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:– दिनांक 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पंचायत समिती पालघर येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पालघर अंतर्गत महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.

शैला कोळेकर सभापती पंचायत समिती पालघर,हर्षदा तरे पंचायत समिती सदस्य प्रवीण भावसार जिल्हा कार्यक्रम अधिकारी, नरेंद्र रेवंडकर स गट विकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमांमध्ये महिलांच्या आहार व आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या बालकांची नियमित काळजी घेत असतात,त्यांच्या पोषण आहाराबाबत जागरूक असतात, परंतु त्यांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे या अनुषंगाने महिलांचा आहार, आरोग्य स्वतःबद्दलची काळजी, कशी घ्यावी याबाबत वक्त्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नियमित व्यायाम देखील महिलांसाठी आवश्यक आहे,याबाबत वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

तसेच महिला व बालविकास विभागाच्या सर्व योजना,लेक ही लाडकी ही महत्वपूर्ण योजना या जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यात याव्यात आणि याची योग्य रीतीने अंमलबजावणी,त्याबाबत जनजागृती व्हावी असं सर्व मान्यवरांच्या वतीने आवाहन करण्यात आले.

9 मार्च ते 23 मार्च या काळात राबवण्यात येणाऱ्या पोषण पखवाडा बाबत उपस्थित महिलांना माहिती देण्यात आली.आणि प्रत्येक गावात कार्यक्रम घेऊन महिलांपर्यंत पोषण आहाराचे महत्त्व पोचवावे आणि त्याबाबत जनजागृती करण्यात यावी असे आवाहन यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार यांनी केले.

यावेळी उपस्थित महिलांनी महिला जीवनाबद्दल गाणे गायले.
सदर कार्यक्रम गौरी धांगडा प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच सर्व पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका मदतनीस नियोजनाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी संजय वाघ गटशिक्षण अधिकारी, संभाजी पवार संरक्षण अधिकारी, उज्वला डामसे जिल्हा मल्लखांब व जिम्नॅस्टिक, प्रफुल्लता पाटील आरोग्य क्लिनिक सुपरवायझर, स्मिता पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती पालघर, अनिता गावित सख्य महिला मार्गदर्शक यावेळी उपस्थित होते. डिंपल पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट