साई प्रा.व मा.विद्यालय सावित्री नगर येथे विद्यार्थ्याना बाललैंगिक शोषण व पोस्को कायदा बाबत विशेष मार्गदर्शन..

उपसंपादक-रणजित मस्के
छत्रपती संभाजीनगर :– दिनांक 13- 9 -2024 वार शुक्रवार रोजी साई प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सावित्री नगर येथे शाळेचे सर्वेसर्वा माननीय श्री प्रा .गाडेकर सर यांच्या उपस्थितीमध्ये तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तांबे मॅडम यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली बाललैंगिक शोषण व पोक्सो कायदा जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व शासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
त्याप्रसंगी एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशन येथील PSI सौ लाटे मॅडम, कायदा व परिविक्षा अधिकारी सौ. सुप्रियाताई इंगळे मॅडम, सौ बोर्डे मॅडम ,सावित्री नगर येथील समाजसेवक श्री विशाल भाऊ इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com