नवोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय केशोरी येथे ” सायबर गुन्हे व फसवणुक ” या विषयावर विशेष मार्गदर्शन…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- याविषयी थोडक्यांत माहिती अशी की, सध्याच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले असून गोंदिया जिल्हयात ब-याच लोकांची ऑनलाईन फसवणुक होत असल्याने नागरीकांमध्ये विशेषतः शहरी व ग्रामीण भागात याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा , उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग देवरी श्री. विवेक पाटील यांचे मार्गदर्शनात शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची भविष्यात फसवणुक होऊ नये म्हणुन सायबर गुन्हे व होणारी फसवणूक” या विषयावर आज दिनांक-05/09/2024 रोजी नवोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय केशोरी येथे ” सायबर गुन्हे व फसवणुक ” या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजीत करण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रामुख्याने–
१) के.वाय.सी. फ्रॉड
२) स्क्रीन शेअर फ्रॉड
३) केबीसी फ्रॉड
४) लोन फ्रॉड
५) गुगल कस्टमर केअर फ्रॉड
६) फेसबुक प्रोफाईल फ्रॉड
७)ओ.एल. एक्स फ्रॉड
८) अमेझॉन फ्रॉड
९) व्हॉटसअप व्हिडीओ कॉल
१०) मॅट्रीमोनिअल फ्रॉड
यामध्ये फसवणुक करणारे लोक वेगवेगळया प्रकारची आमिषे देवुन नागरीकांची दिशाभुल करून कशा प्रकारे फसवणूक करतात व आपण काय सावधानता बाळगायला पाहीजे याविषयी विविध दाखले देवून, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम प्रकाश गेडाम, पोलीस हवालदार संजय मारवाडे व महिला पोलीस शिपाई कोचे, सायबर सेल गोंदिया यांनी कार्यशाळेत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेत पोलीस निरीक्षक गणेश वनारे ठाणेदार केशोरी, विद्यालयाचे प्राचार्य श्री. नरेंद्र काडगाये सर, साखरे सर ,पोहवा.सुशिल रामटेके व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ,तसेच शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पाऊलझगडे सर व आभार प्रदर्शन कावळे सर यांनी मानलेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com