ऑनलाईन फसवणूकीपासुन सतर्क रहाण्यासाठी पालघर पोलीसांतर्फे विशेष मार्गदर्शन…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :-सध्या बऱ्याच लोकांची सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फसवणूक होत आहे. व्हाट्सअप द्वारा, फेसबुक, इंस्टाग्राम, असे अनेक अशा सोशल मीडिया द्वारा, आजच्या या युगात मोबाईल हा एक जीवनाचा अंग झल्यासारखं आहे.

कारण ऑनलाइन वर्किंग,ऑनलाइन बँकिंग, ऑनलाइन खरेदी,विक्री, ऑनलाइन चॅटिंग, ऑनलाइन फोटो अपलोड, फोटोग्राफी, व्हिडिओ ग्राफी, ऑनलाइन गेम,युट्युब, तुमची पूर्ण ऑनलाईन डेटा, ई-मेल आयडी, फेसबुक, इंस्टाग्राम, अशा अनेक गोष्टी मुळे आपण नेहमी सोशल मीडिया मध्ये ऍक्टिव्ह असतो.

त्यामुळे मोबाईल हॅकर हे नेहमी आपल्या रोजच्या दैनंदिन सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्यानवर त्यांची नजर असते आपल्या कळत नकळत अमिष दाखवून बळी पडतात.

ऑनलाईन नोकरी संबंधीत अनोळखी व्यक्तीकडून आपल्याला whatsapp,
facebook वरुन मॅसेज येतात. आपण ती नोकरी स्विकारल्यानंतर आपणास
instagram, youtube वरील व्हिडिओ Like किंवा Subscribe करण्यास
सांगीतले जाते. त्यावेळी तुम्ही व्हिडिओ Like केल्याबद्दल पैसे देण्याचे सांगुन तुमच्या बॅक
खात्याची माहिती प्राप्त करुन आपल्या खात्यावर पैसे पाठवितात व आपला विश्वास
संपादन करुन आपणास त्यांनी तयार केलेल्या telegram ग्रुपमध्ये अॅड करतात ज्या
ग्रुपमध्ये त्यांचेच साथीदार असतात. सुरवातीला गृपवर १०००/- रु. किंवा २०००/-रु. अशी रक्कम भरून त्यामोबदल्यात ४००० ते ५००० अशी रक्कम देवुन नंतर लाख रुपयांची
मागणी करुन त्याबदल्यात नागरीकांना जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवुन
फसवणुक केली जाते.

तसेच सध्या व्हाट्सअप वरती अनोखी नंबर वरून म्हणजेच ( मोबाईल हॅकर द्वारा ) तुमच्या व्हाट्सअप वरती चेहरा तुमचा व नग्न बॉडी असे अश्लील फोटो तुमचा व्हाट्सअप वर येतात व तुम्हाला मेसेजद्वारे पैशाची मागणी करतात आणि नाही दिल्यास तुझे फोटो शोषलमीडियाला वायरल करू अशी ब्लॅकमेल करतात पण अशावेळी घाबरून न जाता पहिला तर आपल्या घरातल्या लोकांशी ही गोष्ट शेअर करा त्यानंतर त्वरित सायबर ला जाऊन ऑनलाइन तक्रार करावी व यासाठी पोलीस अधीक्षक पालघर सायबर पोलीस स्टेशन यांनी. सायबर क्राईम टोल फ्री नंबर. १९३०दिले आहे.

तसेच सायबरने फसवणूकिपासून आपण सतर्क राहावे व अशी फसवणूक झाल्यास त्वरित संपर्क करा असे आवाहन पोलीस अधीक्षक पालघर सायबर यांनी केले आहे.
०१. सायबर क्राईम टोल फ्रि नंबर १९३० (सायबर फसवणुक झाल्यास त्वरीत संपर्क करा)

०२. बँकेच्या नावाने येणा-या (मी बैंक मॅनेजर बोलतोय) अशा फसवणुकीच्या कॉल पासुन सावध रहा व आपली बैंकेची गोपणीय माहिती त्यांना देऊ नये.

०३. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरुन QR CODE स्कैन करु नका.

०४. फोनकॉल वर कोणतीही बँकेची गोपणीय माहिती शेअर करु नका.

०५. सोशल मीडीयावर नातेवाईक म्हणुन मॅसेज, फोन करुन पैश्याची मागणी करणा-यांपासून सावध रहा.

०६. सोशल मीडीयावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करु नये. (Facebook, Twitter, Instagram, Telegram व इतर)

०७. गुगल वर ग्राहक सेवा (कस्टमर केअर) क्रमांक शोधु नका.

०८. झटपट कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन लोनअॅप वरुन कर्ज घेताना नोंदणीकृत वित्तीय संस्था असल्याची खात्री करा. अन्यथा आपल्याकडुन पैश्याची मागणी करुन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होईल. तरी अशा फसवणुक टोळी पासुन सावध रहा.

१०. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरुन कोणतेही अॅप डाउनलोड करुनका. उदा. (Any Desk, Team Viewer, Quick Support)

११. महावितरण लाईट बिल भरण्यासाठी ग्राहकाना फसवणुक करणा-या कोणतेही लिंक व मॅसेजवर क्लिक करु नका.

१२. कोन बनेगा करोडपती (KBC), कॅश बैंक ऑफर, दिवाळी धमाका, लकी नंबर अशा फसवणुकीच्या कॉल व मॅसेज वर कोणताही प्रतिसाद दऊ नये किंवा अशा प्रकारच्या मोबाईल वर आलेल्या लिंक वर क्लिक करु नये.

१३. अनोळखी नंबरवरुन येणा-या व्हिडीओ कॉल स्विकारु नका तसेच त्यांनी सागितलेल्या अश्लिल विनंत्या स्वीकारू नका अन्यथा मोबाईल मधील स्क्रीन रेकार्डव्दारे व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लैक मेल करु शकतात. पैश्याचे अमिष दाखवणा-या संदेशावर विश्वास ठेवू नये व आपली वैयक्तिक माहिती,

१४.पासवर्ड, बैंक खात्याची माहिती देऊ नये.

१५. सध्या नागरीकांना त्यांचे सिम बंद होते आहे असे मॅसेच प्राप्त होत असून हे टेलिफोन कंपनीचे नसुन सायवर चोरटयां कडून

१६. टाकलेले जाळे आहे. याव्दारे तुमचे (KYC) कागदपत्रे मिळगुन आर्थिक फसवणुक होऊ शकते. सोशल मीडीयावरुन उदा. (OLX, FACEBOOK व इतर) मोबाईल, गाडी व इतर अनेक वस्तुची कमी किंमत दाखवुन तुमची
आधिक फसवणुक होऊ शकले तरी अशा दिलेल्या ऑफर पासुन सावध रहा.

१७. सोशल मिडीयावरुन नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तुमच्याकडुन पैशाची मागणी करुन तुमची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुक होऊ शकते तरी अशा दिलेल्या ऑफर पासुन सावध रहा.

१८ . https ने सुरुवात होणा-या सुरक्षित संकेत स्थळाचा वापर करा.

१९. विविध समाज माध्यमातुन धार्मिक भावना भडकवणारे संदेश, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अश्लिल साहित्य पोस्ट करू नका अथवा फॉरवर्ड लाईक व शेअर करु नका.

२०. जर तुम्हाला अनोळखी ई-मेल सोबत अटॅचमेंट आली असेल तर त्याला कधीही उघडुन बघु नये.

२१. काही टोळ्या मुलांना उचलुननेत असल्याच्या अफवा सोशल मीडीयावर काही लोकांकडुन पसरवल्या जात आहेत नागरीकांनी अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये किंवा पसरवू नये त्वरीत नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करा.

२२. टेलिग्रामव्दारे होणा-या जॉब फसवणुकी पासुन (Task fraud) सावध रहा.

२३. सायबर संबंधित ऑनलाईन तक्रार https://cybercrime.gov.in /

२४. सायबर सुरक्षा वाचक हा संदेश आपले नांतेवाईक, मित्रमंडळी यांच्या फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा जेणेकरुन तेही सावध राहतील.

  1. आपली सुरक्षितता ही आपल्या हातात असते, यास्तव या सायबर युगातील आपले प्रत्येक पाऊल सावधपणे टाकू या आणि सजग राहुया..

१. पोलीस अधिक्षक पालघर सायबर पोलीस स्टेशन ८८०६७०४०७५, ८६६९६०४०७५

२. मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय सायबर ०२२ २८११०१३५,९०००४८८०१३५

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट