नवप्रविष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदारांना लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे विशेष मार्गदर्शन ..

उपसंपादक-रणजित मस्के
घाटकोपर:– मुंबई : मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयात २१ नविन प्रोबेशनरी पोलीस उप निरीक्षक व ५८० नवप्रविष्ठ पुरुष व महिला पोलीस अंमलदार नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करुन हजर झाले आहेत.या पोलिसांना पुढील कर्तव्यालसाठी लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मार्गदर्शन केले.



नवप्रविष्ठ अधिकारी व अंमलदार यांना रेल्वे पोलीस दल, त्याची संरचना, कार्यक्षेत्र, कार्यपद्धत आणि रेल्वे पोलीसांसमोरी आवाहने, पोलीस ठाण्यातील दैनदिन कामकाज या बाबतची इंत्यभुत माहीती मिळावी याकरीता डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई यांचे मार्गदर्शन व संवाद सत्र नवरंग सभागृह, लोहमार्ग पोलीस मुख्यालय, घाटकोपर येथे आयोजित करण्यात आले होते.
सर्व प्रथम आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करुन, पोलीस दलात नियुक्त होऊन पोलीस प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई यांनी नवप्रविष्ठ अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले. त्यांच्याशी संवाद साधत रेल्वे पोलीस दल, त्याची संरचना, कार्यक्षेत्र, कार्यपद्धत आणि रेल्वे पोलीसांसमोरी आवाहने, पोलीस ठाण्यातील दैनदिन कामकाज, पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकाता याची माहिती माननीयांनी सर्व उपस्थितांना करून दिली, पोलीस दलातील जबाबदारीचे कर्तव्य पार पाडताना वैयक्तीक आयुष्य व व्यावसायीक आयुष्य याची सांगड कशी घालावी, भ्रष्टाचारमुक्त पोलीस कर्तव्य, सामाजिक बांधीलकी, पोलीसांचे दायीत्व, समाजाप्रती सुटल रष्टीकोन, तत्परता, सचोटी या विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. ज्ञानेश्वरीचे संदर्भ देऊन आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडविता येऊ शकतात हे दाखवून दिले. उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमांची सांगता झाली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com