मिरज पोलीसांकडून २६ जुन हा जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मिरज :-२६ जुन हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन पाळण्यात येतो त्यानिमीत्त मा. पोलीस अधिक्षक सो संदीप घुगे व अपर पोलीस अधिक्षक मा. रितु खोकर यांचे मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडुन खालीलप्रमाणे कार्यक्रम घेण्यात आले.

दि.२६.०४.२०२४ रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे प्रभारी श्री भैरु तळेकर साहेब यांनी
सोनी ता. मिरज येथील क्रांतिवीर दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व कळंबी ता. मिरज येथील अजितराव घोरपडे विद्यालय या ठिकाणी जावुन तेथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ म्हणजे काय, अंमली पदार्थाचे सेवन केलेने होणारे दुष्परिणाम, तसेच अंमली पदार्थाचे सेवन बाळगणे या बद्दलची कायद्याची तरतुद व त्याची शिक्षा याबाबत त्यांना मागदर्शन केले तसेच महीला सुरक्षेबाबतीत मागदर्शन करुन त्यांना शासनाचे ११२ डायल या सुविधे बाबत माहीती देण्यात आली. सदरवेळी सोनीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक, श्री प्रशांत चव्हाण सर, शिक्षक शिक्षककेतर स्टाफ व विद्यार्थी विर्धाथीनी पोलीस पाटील प्रज्ञा पाटील मॅडम बीट अंमलदार व पोलीस स्टाफ उपस्थित होते.

तसेच कळंबी शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक, श्री डी.एन पाटील सर, शिक्षक शिक्षककेतर स्टाफ व विद्यार्थी विर्धाथीनी पोलीस पाटील मन्सुर नदाफ, बीट अंगलवार व पोलीस स्टाफ उपस्थित होते.

तसेच दि.२४.०४.२०२४ मालगाव येथील एस. एम. हायस्कुल मालगाव येथे पोलीस ठाणेकडील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मुंडे, पोलीस उपनिरीक्षक भापकर, पोलीस उपनिरीक्षक लामदाडे परि. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी व डॉ. चंद्रशेखर हळिंगळे मानसोपचार तज्ञ निर्मल व्यसन मुक्ती केंद्र मिरज यांनी अंमली पदार्थाचे सेवनाने होणारे दुष्परिणाम, शारीरीक हाणी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पोऊनि श्री पांडुरंग मुंडे यांनी अंमली पदार्थ म्हणजे गांजा चरस अफु याबरोबरच किरकोळ स्वरुपात म्हणजे गुटखा बिडी तंबाखु हे देखील अंमली पदार्थच असुन त्याची तीव्रता कमी प्रमाणात असली तरीही त्यामुळे शरीराचे नुकसान होते.
याबाबत मार्गदर्शन केले.

त्यावेळी एस. एम. हायस्कुलचे प्राचार्य कोष्टी सर, शिक्षक स्टाफ, व विद्यार्थी विर्धाथीनी उपस्थित होते.

तसेच अंमली पदार्थ विरोधाचे माहीती संकलित करुन ती पोलीस पाटील तसेच वेगवेगळया सोशल मिडीया वरती जनजागृती करीता शेअर करणेत आली. तसेच अंमली पदार्थ विरोधी दिनाचे जनजागृती करीता बॅनर तयार करुन ते प्रसारीत करण्यात आले. तरी सदरची बातमी आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द होणेस विनंती आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट