संपूर्ण पालघर जिल्ह्यात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचे सुरक्षा पोलीस टाइम्स परिवारातर्फे विशेष सत्कार…

0
Spread the love

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल

पालघर ;

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून संपुर्ण पालघर जिल्ह्यात दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी नवीन वर्षाच्या सुरवातीलाच सुरक्षा पोलीस टाइम्सच्या मुख्य संपादिका श्रीमती दिप्ती भोगल मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि संपुर्ण सुरक्षा पोलीस टाइम्स परिवाराच्या माध्यमातून आज पालघर जिल्ह्यात अति उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्य करणाऱ्या जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांना पुष्पगुच्छ,राजा शिव छत्रपती पुरस्काराचे सन्मानचिन्ह आणि प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच सुरक्षा पोलीस टाइम्सच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले .यावेळी पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा.श्री. गोविंद बोडके, पालघर पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे , उप अधीक्षक श्रीमती संगीता शिंदे (अल्फान्सो ) , पालघर उपविभागीय अधिकारी श्री. अभिजीत धाराशिवकर, बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विकास नाईक, पालघर तहसीलदार तथा दंडाधिकारी श्री. रमेश शेंडगे, बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार, वानगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. योगेश पाचपुते, सातपाटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.योगेश जाधव, तारापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सागर कावळे, पालघर रेल्वेमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन इंगवले, रेल्वेमार्गाचे आर पी एफचे पोलीस अधिकारी श्री. विनीत कुमारजी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी पालघर जिल्ह्यातील आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्स परिवारातील संपुर्ण टिम उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट