मुंबई जिल्ह्यात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचे सुरक्षा पोलीस टाइम्स परिवारातर्फे विशेष सत्कार…

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
मुंबई ;
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुंबई जिल्ह्यात दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी नवीन वर्षाच्या सुरवातीलाच सुरक्षा पोलीस टाइम्सच्या मुख्य संपादिका श्रीमती दिप्ती भोगल मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि संपुर्ण सुरक्षा पोलीस टाइम्स परिवाराच्या माध्यमातून आज मुंबई जिल्ह्यात अति उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी यांना पुष्पगुच्छ,राजा शिव छत्रपती पुरस्काराचे सन्मानचिन्ह आणि प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच सुरक्षा पोलीस टाइम्सच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले .यावेळी मुबई परिमंडळ – ७ चे पोलीस उपायुक्त श्री. विजयकांत सागर, पवई पोलीस ठाण्यांच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. सविता माने , घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शेलार व विक्रोळी गांधीनगर वहातूक पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी मुंबई आमचे उपसंपादक श्री रणजित मस्के यांच्यासह आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्स परिवारातील संपुर्ण टिमसह दिपेश पवार उपस्थित होती.





