विशेष कार्यकारी दंडाधिकारी, तथा उप विभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्री. एस. बी. ताजणे यांचे आदेशाने दोन सराईत गुन्हेगारांची भंडारा कारागृहात रवानगी…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

  याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिनांक 27 जुन 2023 रोजी गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे रामनगर हद्दीत,चोरी,जबरी चोरी, दुखापत, दरोडा व खुन,अपहरण करणे आदि सदरातील गुन्हे करणारे 

सराईत गुन्हेगार आरोपी नामे-

1) प्रज्वल अनिल मेश्राम वय 19 वर्षे रा. कुडवा. तालुका जिल्हा – गोंदिया

2) संकेत अजय बोरकर वय 18 वर्षे रा. न्यू लक्ष्मी नगर, गोंदिया तालुका, जिल्हा- गोंदिया .

               यांचे विरुध्द पोलीस ठाणे रामनगर चे अभिलेखावर गुन्ह्यांची नोंद आहे .आरोपीविरुध्द दाखल गुन्हे अभिलेखा वरुन आरोपी यांनी यापूढे आपले वर्तणुकीत सुधारणा घडवून आणावी या उद्देशाने ठाणेदार रामनगर यांनी आरोपी विरुध्द पो.स्टे. रामनगर येथे फो.प्र.सं. कलम 110 प्रमाणे प्रतिवृत्त दाखल करुन प्रतिवृत्त चौकशी करीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी, तथा उप विभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्री. एस. बी. ताजणे यांचे कार्यालयात पाठविले होते.

     प्रतिवृत्ताची चौकशी दरम्यान जाबदेणार यांना वेळोवेळी नोटीस, जमानती वारंट बजावून सुध्दा हे दोन्ही गुन्हेगार पेशी तारखेवर येण्यास टाळाटाळ करीत होते. यावरुन हे कायद्याला जुमानत नसल्याचे दिसून आल्याने व जाबदेणार यांना जामीनाशिवाय मोकळे ठेवल्यास यांचे कडून परत एखादा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडून सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता असल्याने तसेच आगामी काळात दिनांक 28/06/2023 रोजी मुस्लीम बांधवांचा ईद सण उत्सव व हिंदु बांधवांचा आषाढी एकादशी उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. उप विभागात दोन्ही उत्सव शांततेत संपन्न व्हावे या उद्देशाने नमूद सराईत इसमांना दिनांक 26/06/2023 रोजी अटक करुन भंडारा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट