बार्शी बस स्टँड येथे एका वृद्ध महिलेस उडवून रिक्षा चालक पसार- पोलीस जाणीव सेवा संघाचे महिलेस विशेष सहकार्य..
उपसंपादक-रणजित मस्के
बार्शी:– बार्शी पोलीस स्टेशन जवळ आणि बस स्टॅन्ड चौक येथे एका वृद्ध महिलेला अज्ञात ऑटो रिक्षा चालकांनी उडवले व तो रिक्षा चालक न थांबता निघून गेला या वृद्ध महिलेच्या पायाला मोठी जखम झाली असून पाय फ्रॅक्चर झालेला असून या महिलेचे वय अंदाजे 80 ते 85 आहे.
ही आज सकाळी 06:30 ची घटना आहे. ही महिला बार्शी येथील टिळक चौक येथील रहिवासी आहे. असं सांगत होत्या. याची कल्पना त्यांच्या नातेवाईकांना पण दिली.
पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी महिला उपाध्यक्षा भाग्यश्रीताई बोंडवे व सदस्य झगडे सर यांनी तात्काळ त्या घटनास्थळी धाव घेऊन त्या महिलेची विचारपूस केली व तेथून बोंडवेताई यांनी त्वरित ॲम्बुलन्सला फोन लावला व ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी येऊन त्या वृद्ध महिलेस घेऊन गेले.
याची संपूर्ण कल्पना बार्शी तालुका अध्यक्ष सम्मेद तरटे यांना देण्यात आली.तेव्हा तरटे यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. ती वृद्ध महिला रोडवर बसून रडत होती त्यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अतोनात मदत करून आपले कर्तव्य पार पाडले. पोलीस जाणीव सेवा संघ हे सदैव पोलीस व नागरिकांच्या सेवेत कार्य करण्यासाठी तत्पर असते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com