पालघर मध्ये मतदानासाठी नागरिकांमध्ये विशेष जनजागृती मोहीम…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर :-भारत निवडणुक आयोगाकडुन लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 हा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुषगाने पालघर जिल्हातील मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानासाठी प्रवृत्त करणे आयोगाकडील या विषयी स्थायी सुचना आदेशांची अंमलबजावणी करणे व नागरिकांमध्ये निवडणुक विषयी जनजागृती करण्यासाठी SVEEP (Systematic Voters Education Program) जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर मोहिम राबविण्यात येत आहेत.

वरील बाबतीत मोठ्या प्रमाणात मतदान करावे या करीता दि.19/03/2024 ते दि. 15/04/2024 या कालावधीत संकल्प पन्त्र ची संकल्पना राबविण्यात आली असुन जिल्हातील 2992 शाळांना शाखांना 6,86,403 संकल्प पत्र वाटप करण्यात आली व सर्व विदयार्थ्याकडून परिपूर्ण प्रपत्र भरुन 5,78,847 तालुकास्तरावर प्राप्त झाली आहेत. सदर संकल्प पत्र भविष्यातील पिढीही जागृत होईल व पालकांनाही मतदानाचे महत्व लक्षात यईल.
तसेच लहान मुलांचा बालहट्ट पुरविण्यात पालक पुढाकार घेऊन मतदान करण्यात प्रवृत्त होतील असा विश्वास जिल्हा प्रशासनास असुन प्रत्येक विदयार्थ्यांनी किमान सरासरी 2 पालकांपर्यत पोहचल्यास जिल्हातील 13,72,806 मतदारापर्यंत पोहचण्यात व जनजागृती करण्यात जिल्हा प्रशासनास यश आले.
मतदानाची टक्केवारी वाढावी, जनजागृती व्हावी या उद्देशाने दिनांक 28/03/2024 रोजी स.त्तु. कदम शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी देशाचा नकाशा (मानवी रांगोळी 150 फुट* 130 फुट) आकाराची तयार करण्यात आली. एकूण 750 विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मानवी साखळीच्या माध्यमातुन नकाशा साकारण्यात आला.
या ठिकाणी 18 ते 20 वयोगटातील पालघर व बोईसर महाविद्यालयातील एकुण जवळपास 3000 विद्यार्थी उपस्थित होते व त्या विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमाची ड्रोनच्या सहाय्याने चित्रीकरण तयार करून विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासहीत मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत केले.
सोबत दिनांक 04/05/2024 रोजी सकाळी ठिक 8.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे जिल्हयातील विविध आस्थापनावरील महीला अधिकारी / कर्मचारी तसेच जिल्हयातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या विविध महीला अधिकारी कर्मचारी यांची
बाईक रॅली आयोजीत करण्यात आली असुन त्यमध्ये बाईक रॅलीचा मार्ग हा मा. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक स्वातंत्रवीर सावकर चौक ते वळणनाका ते पाचबत्ती हुतात्मा स्तंभ असा मार्ग निश्चित केला आहे सदर रॅली मध्ये किमान 500 महीला सहभागी होऊन यामाध्यमातून मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
पालघर जिल्हयातील नागरीकांना मतदान करणेकामी प्रवृत्त करणेच्या दृष्टीकोणातुन दिनांक 05/05/2024 रोजी सकळी 6.00 वजता 3 किमी, 5 किमी व 10 किमी मॅरेथॉन जिल्हाधिकारी कार्यालय पालघर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक स्वातंत्रवीर सावकर चौक ते वळणनाका हुतात्मा स्तंभ. असा मार्ग निश्चित करणेत आला आहे. पाचबूली ते पासबत्ती यामध्ये पालघर जिल्हयातील शाळा कॉलेजमधील युवा व युवती, जेष्ट नागरीक, क्रिडा संस्था, विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस, स्काऊड गाईड, NCCNSS, चे असे सरासरी एकुण विद्यार्थी सहभागी होणार आहे.सोबत सर्व मतदार संघामध्ये वर्ग 1 चे अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी /कर्मचारी यांची पालघर जिल्हयातील मतदार संघनिहाय जबाबदारी वाटप करण्यात आली असुन
SVEEP अंतर्गत मतदारामध्ये जनजागृती करणेकरीता विविध उपक्रम राबविणेत येत आहे आणि यामध्ये राज्याची सरासरी मतदान टक्केवारी पेक्षा कमी होणाऱ्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष केंद्रीतच करून भौगोलिक परीस्थितीशी अनुरूप कार्यक्रम आयोजित करणेत येत आहे.
जगातील सर्वात मोठा लोकशाही म्हणून मानला जाणाऱ्या भारत देशामध्ये यंदा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे. मतदार राजाला लोकशाहीने जो मतदानाचा हक्क दिला आहे तो मतदान करून बजवावा व येणाऱ्या 20 मे 2024 रोजी 22- पालघर लोकसभा (अ. ज ) करिता मोठ्या प्रमाणावर मतदान करा असे जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पालघर जिल्हातील नागरीकांना केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com