जास्त परतावा मिळवण्याचे अमिषाने होणारी फसवणूक टाळण्याकरीता मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालया तर्फे नागरिकांना विशेष आवाहन !!!

0
Spread the love

प्रतिनिधी-अक्षय कांबळे

मिरा-भाईंदर:– मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना सायबर पोलीस ठाणेकडून जाहिर आवाहन करण्यात येते की,
लहान गुंतवणूक धारकांना जास्त परतावा देण्याचे आश्वासन देणान्या बनावट कंपन्या व ऑनलाईन प्लेटफॉर्मची संख्या झपाटयाने वाढत असल्याने याद्वारे आर्थिक फसवणूक होत असल्याचे दिसून आले आहे.

जास्त परताव्यामुळे पैसे गमावण्याचा धोका जास्त असतो असे दावे करणाऱ्या कंपन्या अनेकदा लोकांची फसवणूक करतात.

याशिवाय या कंपन्यांनी लोकांची फसवणूक केल्याचे तक्रारी मोठया प्रमाणावर दाखल होत आहेत.

याबाबत गुंतवणूकदारांनी दूर रहावे असा सल्ला ही सेबीकडून देण्यात आलेला आहे.

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…

  • गुंतवणूकीचे निर्णय घेताना काळजी घ्या, तुमचे पैसे हुशारीने गुंतवा.
  • कंपन्यांच्या खात्रीशिर आणि जास्त परताव्याच्या खोटया दाव्यांना बळी पडू नका.
  • फेसबुक, इन्स्टाग्राम अथवा व्हॉट्सअॅपवर जास्त परतावा देण्याच्या प्रमोशनल अॅडवर विश्वास ठेवू नका.

याद्वारे आपली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारच्या फसवणूकीमध्ये टेलीग्राम चॅनल, व्हॉट्सअॅप ग्रुपवर अॅड करून तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे स्क्रिनशॉट, मेसेजेस दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते.

गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवून फसवणूक करण्यात येते. एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणूकदारांना जास्त व खात्रीशिर परताव्याची हमी देतात.

अशा गुंतवणूकीमध्ये आर्थिक फसवणूक होण्याचा धोका मोठया प्रमाणात असतो.

  • क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायदयाप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. अशी गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
  • कोणतेही अॅप्लीकेशन डाऊनलोड करू नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
  • ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.
    मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे.

असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर पोलीस ठाणेस संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.

सायबर पोलीस ठाणे व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्रमांक :- ९००४८८०१३५
सायबर पोलीस ठाणे ई-मेल आयडी: cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट