स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी २७ किलो ९२५ ग्रॅम गांजा माल जप्त करून ३ आरोपीस केले जेरबंद..

सह संपादक- रणजित मस्के
सांगली :


पोलीस स्टेशन इस्लामपूर
अपराध क्र आणि कलम
१६९/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (ब), २९
फिर्यादी नाव
पोह / अरूण जालिंदर पाटील, स्था. गु. अ. शाखा, सांगली
गु.घ.ता वेळ
गु.दा.ता वेळ २४/०३/२०२५ रोजी
माहिती कशी प्राप्त झाली
पोह / अरूण पाटील पोशि / विनायक सुतार पोशि / सुरज थोरात
दि. २४/०३/२०२५ रोजीचे १६.३५ वा.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा पोलीस निरीक्षक, नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली
पोहेका / अमोल ऐदाळे, सचिन धोत्रे, संकेत मगदुम, अरुण पाटील, अतुल माने, आमसिद्ध खोत, पोना/ सुशिल मस्के, श्रीधर बागडी, प्रकाश पाटील, पोकों/विनायक सुतार, रोहन घस्ते, सुरज थोरात, ऋतुराज होळकर, गणेश शिंदे, सायबर पोलीस ठाणेकडील पोशि / कॅप्टन गुंडवाडे,
अटक दिनांक दि.२४/०३/२०२५ रोजी
आरोपीचे नावे व पत्ते
१) सुनिल रामचंद्र कुंभार, वय २८ वर्षे, रा ऐतवडे खुर्द, ता वाळवा.
२) सुजय बबन खोत, वय ३४ वर्षे, रा खोत मळा, आष्टा, ता वाळवा.
३) परशुराम सिद्धलिंग पोळ, वय ३४ वर्षे, रा पोळ गल्ली, आष्टा, ता वाळवा.
जप्त मुद्देमाल
१) ८,३७,७५०/- रू. प्लॅस्टिकच्या गोण्यामध्ये हिरवट काळपट रंगांचा फुलबोंडे असलेला तयार गांजा २७ किलो ९२५ ग्रॅम असलेला कि. अं.
२) २,५००/- रू. रोख रक्कम
८,४०,२५०/-रू. (आठ लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रूपये)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
मा. चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सांगली जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती (अॅन्टी ड्रग्ज टास्क फोर्स) गठीत करण्यात आलेली असून सदर समितीच्या घेण्यात आलेल्या साप्ताहिक बैठकीमध्ये त्यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांवर कारवाई करणेसाठी सुचना दिलेल्या आहेत.
सदर सुचनेप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांवर कारवाई करणेसाठी त्यांचे अधिनस्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे.
त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांचे पथकामधील पोहेकों / अरूण पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नामे सुनिल कुंभार, रा ऐतवडे खुर्द हा सुजय खोत व परशुराम पोळ यांचेकडून तयार गांजा माल घेणेकरीता ओझर्डे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे येणार आहेत.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, इस्लामपूर मार्गे पेठ नाका येथून ओझर्डे येथील ओझर्डे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे सापळा लावून थांबले असता थोड्या वेळाने तीन इसम कुंभार वस्तीवर येवून शेतातील ऊसाच्या वाडयाची गंजी लावून ठेवलेल्या ठिकाणी जावून थांबले. त्यातील एकाने वाडयाच्या गंजीखाली लपविलेल्या पांढ-या रंगाची गोणीची पोती काढली. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) सुनिल रामचंद्र कुंभार, वय २८ वर्षे, रा शिवराज विद्यालयाचे पाठीमागे, ऐतवडे खुर्द, ता वाळवा २) सुजय बबन खोत, वय ३४ वर्षे, रा खोत मळा, आष्टा, ता वाळवा ३) परशुराम सिद्धलिंग पोळ, वय ३४ वर्षे, रा पोळ गल्ली, आष्टा, ता वाळवा. अशी सांगितली.
त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांनी त्यांना त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांचे कब्जात तयार गांजा माल व रोख रक्कम मिळून आली. त्यांचेकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता सुनिल कुंभार याने सांगितले की, सुजय खोत व परशुराम पोळ यांचेकडून तयार गांजा माल खरेदी करणेकरीता आला आहे. तसेच सुजय खोत व परशुराम पोळ यांनी सांगितले की, सदरचा गांजा माल हा त्यांनी नामेदव तेलंग (पूर्ण नाव माहित नाही), रा राजमंडरी, हैद्राबाद याचेकडून आणला असल्याचे सांगितले. लागलीच सदर आरोपी व गांजा माल सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी इस्लामपूर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत.