स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यानी मिरज शहरात नकली सिगारेट विक्री व साठवणुक करणारे २ इसमांवर केली कारवाई..


सह संपादक रणजित मस्के
सांगली
पोलीस स्टेशन
सांगली शहर
गु.घ.ता वेळ
दि. २८/०५/२०२५ रोजीचे १३.४५ वा. चे दरम्यान
कारवाई १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
०१
अपराध क्र आणि कलम
२५६/२०२५ बी.एन.एस. कलम ३४६, ३४७ (৭) व्यापार चिन्ह अधि. १९९९ कलम १०३, १०४ प्रतिलिपी अधिकार अधि. १९५७ कलम ६३
गु.दा.ता वेळ
२८/०५/२०२५ रोजी रोजी २३.१२ वा.
फिर्यादी नाव
यशवंत जनार्दन गोसावी, व्यवसाय नोकरी, रा. ऑफिस नं.१/२, मगरपट्टा, हडपसर, पुणे
माहित्ती कशी प्राप्त झाली आय. टी. सी. कंपनीचे प्रतिनिधी
०२
पोलीस स्टेशन
मिरज शहर
गु.घ.ता वेळ
दि. २८/०५/२०२५ रोजीचे १४.०० वा. सुमारास.
अपराध क्र आणि कलम
२५६/२०२५ कॉपी राईट अॅक्ट १९५७ कलम ५१,५१ (बी), ६३
गु.दा.ता वेळ
२८/०५/२०२५ रोजी २२.५२ वा.
फिर्यादी नाव
अमोल चंद्रशेखर बहुलेकर व्यवसाय
नोकरी, रा. ३३/११, जेल ऑफीसर
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,
यांचे मार्गदर्शानाखाली
सोसायटी, विमानगर, पुणे. माहिती कशी प्राप्त झाली आय. टी. सी. कंपनीचे प्रतिनिधी
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली
पोलीस उप निरीक्षक, कुमार पाटील, स्था. गु. अ. शाखा, सांगली
पोहेकों / बाबासाहेब माने, बसवराज शिरगुप्पी, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, अतुल माने,
सागर टिंगरे, अनिल कोळेकर, दरिबा बंडगर, पोना / सुशिल म्हस्के, श्रीधर बागडी, पोशि / विनायक सुतार, सुमित सुर्यवंशी, ऋतुराज होळकर, सोमनाथ पतंगे
अटक दिनांक दि.२८/०५/२०२५ रोजी
आरोपींचे नावे व पत्ते
१) बिरमा करमचंद गिडवाणी, वय ५० वर्षे, रा क्रांती हॉस्पीटल मागे, सांगली.
२) मुजाहिद मेहबुब चौधरी, वय ३८ वर्षे, रा. पटेल एम्पायर, रेवणी गल्ली, मिरज.
१,१२,७१०/- रू. किंमतीचे गोल्ड फ्लेक किंग्स लाईट सिगारेटचे ६६३ नग.
२) २०,४००/- रू. किंमतीचे गोल्ड फ्लेक किंग्स रेडचे १२० नग.
३) २७,२००/- रू. किंमतीचे गोल्ड फ्लेक हानि डयु चे २० नग.
१,६०,३१०/- एकूण
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस कॉपी राईट व ट्रेडमार्क अॅक्ट नुसार मुळ मालाचे फेर फार करून नकली मालाची विक्री करणाऱ्या इसमांची संबधीत अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिका-यांचे सोबत माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील १) सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ आणि २) पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांची पथके तयार करुन कॉपी राईट व ट्रेडमार्क अॅक्ट नुसार मुळ मालाचे फेर फार करून नकली मालाची विक्री करणाऱ्या इसमांची संबधीत अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिका-यांसोबत माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.
क्र. ०१, गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांना आय टी. सी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी यशवंत गोसावी व श्रीकांत साखरे यांना माहिती मिळाली की, सांगली शहरातील गणपती पेठ येथील श्री. गजानन स्टोअर्स या होलसेल दुकानात गोल्ड फ्लेक कपंनीचे सिगारेट पाकीटमध्ये फेर फार करून नकली मालाची विक्री साठवणुक केलेली आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सांगली शहरातील गणपती पेठ येथील श्री. गजानन स्टोअर्स येथे जावून सदर दुकानात असले इसमास पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी मिळाले बातमीप्रमाणे हकीकत सांगुन त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव बिरमा करमचंद गिडवाणी, वय ५० वर्षे, रा क्रांती हॉस्पीटल मागे, सांगली असे सांगितले. पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील आणि संबधीत कंपनीचे अधिकारी यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला. आय टी सी कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाचे बारकाईने निरीक्षण केले असता सदर सिगारेटची पाकीटे ही कंपनीचे मुळ उत्पादन नसुन अन्य प्रकारे नकली बनविण्यात आल्याचे निदर्शनात आल्याने लागलीच पोलीस उप निरीक्षक, कुमार पाटील यांनी पंचासमक्ष सदरच मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपीस सांगली शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत.
क्र. ०२, गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांना आय टी. सी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी अमोल बहुलेकर यांना माहिती मिळाली की, मिरज शहरातील सराफ कट्टा येथील चौधरी ट्रेडर्स यांचे दुकानात गोल्ड फ्लेक कपंनीचे नकली सिगारेटची विक्री करीत आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे मिरज शहरातील सराफ कट्टा येथील चौधरी ट्रेडर्स येथे जावून सदर दुकानात असले इसमास सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मिळाले बातमीप्रमाणे हकीकत सांगुन त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मुजाहिद मेहबुब चौधरी, वय ३८ वर्षे, रा. पटेल एम्पायर, रेवणी गल्ली, मिरज. असे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि आय टी सी कंपनीचे अधिकारी यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला. आय टी सी कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाचे बारकाईने निरीक्षण केले असता, सदर सिगारेटची पाकीटे ही कंपनीचे मुळ उत्पादन नसुन सदर पाकीटवरील युनिक आय डी एकच असुन तो फेक असल्याने गोल्ड प्लेक हानी ड्यु हे सिगारेट नकली असल्याचे निदर्शनात आल्याने लागलीच सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष सदरच मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपीस मिरज शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.