स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी कवठेमहांकाळ येथील क्लिष्ट खुनाचा गुन्हा कला उघड..

सह संपादक – रणजित मस्के
सांगली
पोलीस स्टेशन
अपराध क्र आणि कलम
फिर्यादी नाव
कवठेमहांकाळ
११९/२०२५ बी.एन.एस. कलम Po3 (1)
तानाजी लक्ष्मण माने, वय ५२ वर्षे, रा. कुडनुर, ता. जत, जि. सांगली.
गु.घ.ता वेळ
गु.दा.ता वेळ
माहिती कशी प्राप्त झाली
दि.२६/०३/२०२५ रोजीचे ११.०० वा. चे पूर्वी
२६/०३/२०२५ रोजी २३.०४ वा.
पोहेकों / अनिल कोळेकर, पोना / संदीप नलावडे, पोना / सोमनाथ गुंडे.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर,
मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, जत विभाग सुनिल सांळुखे यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, रथा. गु. अ. शाखा, सांगली
पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, कवठेमहांकाळ पेलीस ठाणे, सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकों । अनिल कोळेकर, सागर लवटे, नागेश खरात, अमर नरळे, सागर टिंगरे, द-याप्पा बंडगर, महादेव नागणे, संदिप गुरव, सतिश माने, मछिंद्र बर्डे,
पोना/ संदिप नलावडे, सोमनाथ गुंडे, उदय माळी, पोशि / केरवा चव्हाण, सुनिल जाधव, अभिजित माळकर, विक्रम खोत, पोशि / कैप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे
अटक दिनांक दि.०१/०४/२०२५ रोजी
मयताचे नाव
शानाबाई शंकर जाधव, वय ५८ वर्षे, रा. डायमंड हॉटेल जवळ, धुळगाव रोड, कवठेमहांकाळ,
आरोपीचे नाव व पत्ता
किरण आकाराम गडदे, वय २० वर्षे, रा. बाज, ता. जत, जि. सांगली.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दि.२६/०३/२०२५ रोजी डायमंड हॉटेल जवळ, धुळगाव रोड, कवठेमहांकाळ येथुन लोकांनी बंद घरातुन उग्र वास येत असल्याबायत कवठेमहांकाळ पोलीस ठाणेस कळविले होते. सदर ठिकाणी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकरी व अंमलदार जावून बंद घराचे कुलूप तोडले असता, सदर खोलीत एक महिला मयत अवस्थेत मिळून आली. सदर महिलेच्या गळ्याभोवती स्टोन गुडांळलेला होता. सदर मयत महिलेचे पोस्ट मार्टेम केलेनंतर तिचा गळा आवळून खुन झाल्याचे निष्पन्न झाल्याने कवठेमहांकाळ पोलीस ठाणेस अज्ञात इसमाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मा. पोलीस अधीक्षक, सांगली संदीप घुगे सर व मा. अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, जत विभाग सुनिल सांळुखे यांनी सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देवुन सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना देवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन सदरचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणणसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.
सदर घटनास्थळाची पाहणी केली असता तांत्रिक किंवा भीतिक पुरावा उपलब्ध नव्हता.
त्या अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोहेकों / अनिल कोळेकर, पोना/संदीप नलावडे आणि पोना / सोमनाथ गुंडे यांना तांत्रिक माहितीचे विश्लेषण व त्यांचे गोपनिय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कवठेमहांकाळ मधील खुनाच्या गुन्हयातील संशयित आरोपी किरण गडदे हा असून तो सध्या लक्ष्मीनगर, मालगाव येथे आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे मालगाव मधील लक्ष्मीनगर परिसरात सापळा लावून थांबले असता एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला. तसा त्याचा चातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहा पोलीस निरीक्षक पंकज पचार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास नाथ गाय विचारता त्याने त्याचे नाव किरण आकाराम गडदे, वय २० वर्षे, रा. बाज, ता. जत, जि. सांगली असे सांगितले. त्याचेकडे सदर गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु तो गोधळलेला असल्याचे दिसून आल्याने पथकाने कौशल्याचा उपयोग करून त्याचेकडे तपास केला असता त्याने गुन्हयाची कबुली देवून अनैतिक संबंधाच्या कारणातून झालेल्या वादातून सदर आरोपी याने मयत महिलेस दि.२३/०३/२०२५ च्या रात्री गळा दाबून तिचा खुन केला असलेबाबत सांगितले.
भौतिक परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक पुरावे याचे आधारे सदर संशयित इसमाने मयत महिलेचा गळा दाबून खुन केल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर आरोपीस कवठेमहांकाळ पोलीस ठाणेच्या नमुद गुन्हयात वर्ग केले असून पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत.
मा. पोलीस अधीक्षक सांगली, मा. अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, जत विभाग, जत यांनी सदर क्लिष्ट व आव्हानात्मक खूनाच्या गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणल्याने पथकाचे अभिनंदन केले आहे.