स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांनी खून करून अपघाताचा बनाव करणा-या सुभाण तांबोळीस केली अटक…

सह संपादक- रणजित मस्के
सांगली
पोलीस स्टेशन
अपराध क्र आणि कलम
फिर्यादी नाव
तासगाव
गु.र.नं. १९७/२०२५ बि एन एस १०३(१), ११५ (२) प्रमाणे
विजय नामदेव गस्ते पोलीस नाईक
गु.घ.ता वेळ
गु.दा.ता वेळ दिनांक २६/०४/२०२५ रोजी
२१०४ तासगाव पोलीस ठाणे
दि. २४/०४/२०२५ रोजी १२.०० वा. पूर्वी
माहिती कशी प्राप्त झाली पोह/ सागर टिंगरे
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे
मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर
यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / सागर टिंगरे, द-याप्पा बंडगर, सागर लवटे, नागेश खरात
अनिल कोळेकर, सतिश माने, संदिप गुरव, अमर नरळे, मछिंद्र बर्डे, महादेव नागणे, पोना/ उदय माळी, संदिप नलावडे पोशि / विक्रम खोत
मयताचे नाव
मिरासो बाबासो तांबोळी, वय ६२ वर्षे, रा कवठेएकंद, ता तासगाव.
अटक दिनांक दि.२६/०४/२०२५ रोजी
आरोपीचे नाव व पत्ता
सुभाण उस्मानगणी तांबोळी, वय २३ वर्षे, रा कवठेएकंद, ता तासगाव
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दि. २४/०४/२०२५ रोजी तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील कवठेएकंद येथील मिरासो बाबासो तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने त्यांचे डोकीस मार लागल्याने त्यांना उपचार कामी ग्रामीण रूग्णालय, तासगाव येथे दाखल केले असता ते उपचारा दरम्यान मयत झाल्याने ग्रामीण रुग्णालय, तासगाव यांनी सदरबाबत तासगाव पोलीस ठाणेस कळविल्याने त्या अनुषंगाने अ.म.र.नं. ५३/२०२५ बी.एन.एस. १९४ प्रमाणे मयत दाखल करण्यात आले होते.
प्रस्तुत मयताचे अनुषंगाने मयताचे मरणाबाबत साशंकता असल्याने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर मयताचे मरणाचे अनुषंगाने तपास करणेबाबत आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मयताचे
मरणाचे अनुषंगाने तपास करणेबाबत सुचना दिल्या.
त्या अनुशंगाने सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोह/सागर टिंगरे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कवठेएकंद येथील मयत मिरासो बाबासो तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने डोकीस मार लागून मयत झाले नसून त्यांचा पुतण्या सुमाण तांबोळी याने त्यांचे डोक्यात काहीतरी मारून त्यांचा खून केला असुन अपघाताचा बनाव केला आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे संशयित इसम सुभाण उस्मानगणी तांबोळी, वय २३ वर्षे, रा कवठेएकंद, ता तासगाव याची गोपनीय माहिती काढून त्याचे हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे दाखल मयताच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने त्याचा काका मिरासो बाबासो तांबोळी हे त्यास व त्याचे आई वडिलांना नेहमी शिवीगाळ करीत असत व दि. २४/०४/२५ रोजी त्याचे वडिलांना शिवीगाळ करीत असताना त्याचा राग आल्याने हाताने मारहाण करून खाली पाडून रागाचे भरात जवळच असलेली चिनी मातीची बरणी त्यांच्या डोक्यात घालून त्यांचा खून केला होता. त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने काका मिरासो तांबोळी हे जिन्यावरून बरणी घेऊन येत असताना पाय घसरल्याने जिन्यावरून पडून डोक्यास मार लागला असल्याचा बनाव तयार केलेबाबत कबुली दिली आहे.
सदर आरोपी यास पुढील तपास कामी तासगाव पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत.