सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास गोंदिया शहर पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- किंमती 1 लाख 59 हजार 750/- रुपयांचा मुद्येमाल हस्तगत…

याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, फिर्यादी श्री. आकाश कैलाशचंद्र अग्रवाल, वय 48 वर्षे रा. गणेशनगर गोंदिया यांच्या आकाश ज्वेलर्स येथे दिनांक – 29/09/2024 च्या दुपारी 03.30 वाजता ते रात्री 08:00 वाजता चे सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यानी सोन्या चांदीचे दागीने व नगदी असा एकुण-56,700/- रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन पो . ठाणे गोंदिया शहर येथे दिनांक 29/09/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता..



नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना आदेशाप्रमाणे गोंदिया शहर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हा दाखल होताच गोपनिय सुत्राच्या आधारे नमूद गुन्ह्यातील अज्ञात चोरटा आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे- लोकेश कपील श्रीवास, वय 33 वर्षे, रा. कैलाश नगर,कवर्धा जि. कबीरधाम (छ.ग.) यास ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी विचारपूस गुन्ह्याचे तपास केला असता आरोपीने सदर गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपीस गुन्ह्यात दिनांक- 30/09/2024 रोजी अटक करुन त्याच्याकडुन गुन्हयात चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागीने व नगदी असा 56,700/- रुपयाचा मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेली मोटर सायकल पल्सर किंमती अंदाजे एक लाख रुपये, इलेक्ट्रीक कटर (ड्रील मशीन) किं.2000/- रू, स्क्रू डावर किं. 50/- रु. व एक काळी बॅग किंमती 1000/- रु. असा एकुण किमती 1,59,750/- रु. चा मुद्देमाल गुन्ह्यात हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे.. गोंदिया शहर पोलीसांना गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे… सदर गुन्हयाचा तपास पो.हवा. दिपक राहांगडाले हे करीत आहेत. नमूद आरोपी याचे विरुध्द विवीध राज्यात सोन्या-चांदी चोरीचे 8-9 गुन्हे गुन्हे दाखल आहेत… आरोपीने पो.स्टे. गोंदिया शहर हद्दीत आणखी एक गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्याबाबत गोंदिया शहर पोलीस अधीकचा तपास करीत आहेत.



सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक,गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, श्री. साहील झरकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री. किशोर पर्वते, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार पो. हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, मपोहवा रीना चव्हाण, पोशि. सुभाष सोनवाने, मुकेश रावते, दिनेश बिसेन, कुणाल बारेवार व अशोक राहांगडाले यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट