पुणे शहरात सोनसाखळया चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद व गुन्हयातील ०१,१५,०००/- रु किमंतीच्या दोन सोनसाखळया हस्तगत तसेच पुणे शहरातील चैन स्नॅचींगचे ०४ गुन्हे उघडकीसभारती विद्यापीठ पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी…

उपसंपादक – रणजित मस्के
पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हददीत दि.१२/१०/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा चे सुमारास लेकटाऊन रोड बिबवेवाडी व कात्रज लेक येथे मॉर्नीक वॉक करणा-या फिर्यादी नामे वैशाली विठठल गलगली वय ५३ रा लॅण्डमाक लेकटाऊन बिबवेवाडी व साक्षीदार मोहन श्रीपती शिवतरे रा परखेडीनगर पुणे यांची चैन स्नॅचीग झालेवरुन त्यांनी दिल्या फिर्यादवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ६५७/२०२३ भादंवि कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाच्या तपासामध्ये भारती विद्यापीठ गुन्हे शोध पथकाने २२ सी सी टी व्ही ची पाहणी केला असता आरोपी नामे सागर संदीप शर्मा वय २० वर्षे रा एसआरए बिल्डींग, बिबवेवाडी रोड पुणे हा मुख्य आरोपीसोबत निष्पन्न झाल्याने व तो दि १७/१०/२०२३ रोजी तो त्याच्या परिसरात दांडीया कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील अमलदार मितेश चोरमले, अनि चौधरी, अवधूत जमदाडे यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच त्यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे गुन्हेगार मित्र याचे जामीनासाठी ठाणे जिल्हा येथील चैन स्नॅचीग रेकॉर्डवरील आरोपी नामे प्रथमेश उर्फ पिल्या प्रकाश ठमके, वय २५ वर्षे रा पाससेवाडी गणपती मंदीराजवळ, कोपरी ठाणे तसेच आंबीवली खडकपाडा ठाणे यास व त्याचे साथीदारास बोलावून घेवून पुणे शहरात विश्रांतवाडी, येरवडा, भारती विद्यापीठ व कोंढवा पोलीस स्टेशन हददीत अशा मिळून ०५ चैनरनॅचीग केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याचेकडून वरीलप्रमाणे ०४ गुन्हयाची उकल करण्यात आली असून सदर आरोपी नामे सागर संदीप शर्मा वय २० वर्षे रा एसआरए बिल्डींग, बिबवेवाडी रोड, पुणे याचेकडून २२ ग्रॅम वजनाचे ( ०२ तोळे ०२ ग्रॅम वजनाचे) ०१,१५,०००/- रु किमंतीचे चोरीस गेलेले सोन्याच्या दोन चैन हस्तगत करण्यात आली आहे व सदर गुन्हयातील मुख्य आरोपी प्रथमेश उर्फ पिल्या प्रकाश उमके वय २५ वर्षे रा पाससेवाडी गणपती मंदीराजवळ, कोपरी ठाणे व त्याचा साथीदार यांचा शोध सुरु असून त्यांचकडून उर्वरीत मुददेमाल हस्तगत करणे बाकी आहे.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये मा. रितेश कुमार सो पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संदीप कर्णीक सतो. सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदशनाखाली मा. स्मार्तना पाटील सो, पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ ०२ पुणे शहर, मा. नारायण शिरगावकर, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली मा विनायक गायकवाड सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पो स्टे मा विजय पुराणीक, पोलीस निरीक्षक गुन्हे, भारती विद्यापीठ पो स्टे मा गिरीश दिघावकर साो. पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि अमोल रसाळ, पोउनि धीरज गुप्ता, अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार निलेश खैरमोडे, अवधूत जमदाडे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाळे, अशिष गायकवाड, राहूल तांबे, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, मितेश चोरमले अभि चौधरी, अभि जाधव, विक्रम सावंत यांचे पथकाने केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com