सोलापुरात दरोडा व जबरी चोरीच्या गुन्हयातील पाहिजे आरोपीकडुन १ देशी पिस्टल व २ जिवंत काडतुसे हस्तगत करून २ घरफोडीचे गुन्हे केले उघड…

उपसंपादक – रणजित मस्के
सोलापूर :- पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्रे बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्ह्यांच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.
श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, व धनंजय पोरे, सहा पोलीस निरीक्षक त्यांचे नेतृत्वाखाली सपोफी ख्वाजा मुजावर व पथक सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मालाविषयी गुन्हयाचा तपास करणेकामी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, सपोनि / धनंजय पोरे यांच्या पथकातील सपोफौ / ख़्वाजा मुजावर यांना गोपनिय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, पानमंगरुळ ता. अक्कलकोट गावाजवळ एक इसम विनापरवाना स्वतः जवळ देशी पिस्टल बाळगत आहे. सदर बातमी प्रमाणे सरांयीत इसमास सापळा रचुन ताब्यात घेतले असता, त्याचे पॅन्टीमध्ये कंबरेवर खवलेले १ देशी पिस्टल व मॅगझीन मधील २ जिवंत काडतुस असे एकुण ५०४००/- रु. किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. सदर छापा कारवाई बाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गुरनं ६९४/२०२३ आर्म अॅक्ट क. ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीतास अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा तपास अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे करत आहे. आरोपी हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

आरोपी याचेकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासमुळे त्याने सन २०२३ मध्ये खालील पोलीस ठाणेस दाखल गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
(१) अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरनं ११४ / २०२३ भादंवि क. ४५७,३८०
२) अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरंन ३१४ / २०२३ भादंकि क. ४५४, ४५७,३८० तसेच आरोपी याचा सोलापुर ग्रामीण जिल्हयातील पाहिजे/फरारी अभिलेख पाहता. त्याने
१) अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरनं १२१ / २००४ भादंवि क. ३९५ (पहिजे आरोपी)
२) मंद्रुप पोलीस ठाणे गुरनं ३३२/ २०२० भादंवि क. ३९५,३९५ (पहिजे आरोपी) ३) मंद्रुप पोलीस ठाणे गुरंन ३३७ / २०२० भादंकि क. ३७९, ३४ (पहिजे आरोपी)
सदरची कामगिरी ही श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री. हिंमत जाधव, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.सोलापूर | ग्रामीण व सपोनि/धनंजय पोरे, यांच्या नेतृत्वाखाली सपोफौ/ख्वाजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ / परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, रवि माने, पोकॉ/ अन्वर अत्तार, विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, चापोकॉ/ दिलीप थोरात यांनी पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com