सोलापुर ग्रामीण येथील माढा पोलीस ठाण्याला बालविवाह रोखण्यास मोठे यश..

प्रतिनिधी-रणजित मस्के
सोलापूर: रविवार दिनांक 06 नोव्हेंबर 2022 रोजी माढा पोलीसांचे तत्परतेने बालविवाह रोखला.मा. पोलीस अधिक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे साो, यांनी जिल्हयात कोठेही बालविवाह होणार नाही अशा सक्त सुचना दिलेल्या आहेत.

माढा पोलीस ठाणे हददीमध्ये दि.०६/११/२०२२ रोजी मौजे मानेगांव ता.माढा येथे अल्पवयीन मुलगी रा. सिकंदर टाकळी ता.मोहोळ हिचा तुळशी ता.माढा येथील मुलाशी बाल विवाह होणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने मा. पोलीस अधिक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे साो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री हिंमत जाधव साो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जालींदर नालकुल साो यांचे मार्गदर्शनाखाली माढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी मा. सपोनि श्री. शाम बुवा यांनी व पोसई महंमद शेख, ग्रे.पोसई बोटे, सपोफौ भापकर, पोहेकॉ/१६२३ पोरे, मपोना/१७५५५ कस्तुरे, पोकॉ/११३८ घोळवे, पोकॉ/ लक्ष्मण शेळके यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन मुलीची आई व इतर नातेवाईकांकडे यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर मुलीचा विवाह होत असल्याचे सांगितले तेव्हा तिचे वयाबाबत पोलीसांनी खात्री करून तिचे लग्न करता येणार नाही असे समजावून सांगितले परंतु ते सदर मुलीचे गुपचुप लग्न करतील असे वाटत असल्याने व बालविवाह होण्याची शक्यता असल्याने सदर अल्पवयीन मुलीस व तिची आई व इतर नातेवाईक यांना पोलीस ठाणेस बोलावुन घेवुन बालविवाह रोखुन पुढील कारवाई करिता अध्यक्ष बालकल्याण समिती सोलापूर यांचेकडे पाठविले आहे. माढा पोलीसांनी असे बालविवाह होत असतील तर पोलीस ठाणेस माहिती कळविणेचे जनतेस आव्हान केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com