सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या इतिहासात सुवर्ण नोंदहवालदार इकबाल शेख बजावणार विदेशात कर्तव्य..

उपसंपादक-रणजित मस्के
सोलापूर :– महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रत्येक जिल्हा पोलीस दलाचा स्वतंत्र इतिहास आहे. यासाठी अनेक पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी वेळोवेळी मोलाचे योगदान दिले. अशीच उल्लेखनिय कामगिरी हवालदार इक्बाल शेख यांनी केली आहे. आतापर्यंतच्या कर्तव्याची दखल घेत शेख यांची परदेशात कर्तव्यासाठी निवड झाली आहे. यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण नोंद झाली आहे.
इकबाल शेख हे २००३ साली पोलीस दलात रुजू झाले. संगणकीय व इतर तांत्रिक ज्ञानाच्या अनुभवामुळे त्यांना स्थानिक गुन्हे शाखा तसेच सीसीटीएनएस विभागात विविध महत्वाच्या कामाकरीता नियुक्त करण्यात आले. सीसीटीएनएस विभाग येथे कर्तव्यावर असताना इकबाल शेख यांनी सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हयास राज्यात अग्रस्थानिच ठेवून वैयक्तिक पदके व राज्यस्तरीय “फिरते चषक” मिळवून दिले आहे. तसेच अनेक कौशल्य स्पर्धांमध्ये सहभाग घेवून परिक्षेत्रिय, राज्यस्तरीय तसेच अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यांमध्ये प्राविण्य मिळवून ११ सुवर्ण, ९ रौप्य, १४ कांस्य पदके, राष्ट्रीय पारितोषिक, पोलीस महासंचालक पदक, ४० पेक्षा जास्त प्रशस्तीपत्रे पटकाविले आहेत.
सन २०१९ मध्ये लखनौ, उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या ६२ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये “सुवर्ण पदक” प्राप्त करून भारत देशात प्रथम येण्याचा बहुमान मिळवून महाराष्ट्र पोलीस संघास ६१ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच “सर्वसाधारण विजेतेपद” श्री. योगी अदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांचे हस्ते प्रदान केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पोलीस महासंचालकांकडून १ लाखाचे रोख बक्षिस जाहीर करण्यात आले.
सन २०२० मध्ये राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र, नवी दिल्ली यांचे वतीने आयोजित केलेल्या “गुड प्रॅक्टीसेस इन सीसीटीएनएस अॅन्ड आयसीजेएस २०२०” परिषदेमध्ये “सिग्नीफिकन्ट कॉन्ट्रीब्युशन इन सीसीटीएनएस अॅन्ड आयसीजेएस २०२०” या स्पर्धाप्रकारात त्यांनी भाग घेवून वैयक्तिक उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. अजय कुमार भल्ला, केंद्रीय गृह सचिव भारत सरकात, जी. किशन रेड्डी, केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत सरकार, हेमंत नागराळे, पोलीस महासंचरलक, अतुलचंद्र कुलकर्णी, अपर पोलीस महासंचालक यांचे कडून त्यांना “राष्ट्रीय पारितोषिक” प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र व सायबर पिस फौंडेशन नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सीसीटीएनएस हॅकथॉन अॅन्ड सायबर च्यालेंजेस २०२१ या स्पर्धेत सहभाग घेवून “भारत देशातून १० वा” क्रमांक पटकावून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव देशपातळीवर लौकीकास आणले.
सन २०२१ मध्ये त्यांनी सातत्याने पोलीस दलात उत्कृष्ठ कामगिरी केल्याने त्यांना महाराष्ट्र पोलीस दलातील सन्मानाचे मानले जाणारे “पोलीस संचालक पदक” व “विशेष प्रशंसापत्र” हे श्री. संजय पांडे, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कडून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र व सायबर पिस फौंडेशन नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सीसीटीएनएस हॅकथॉन अॅन्ड सायबर च्यालेंजेस २०२१ या स्पर्धेत सहभाग घेवून “भारत देशातून १० वा” क्रमांक पटकावून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव देशपातळीवर लौकीकास आणले.
सन २०२१ मध्ये त्यांनी सातत्याने पोलीस दलात उत्कृष्ठ कामगिरी केल्याने त्यांना महाराष्ट्र पोलीस दलातील सन्मानाचे मानले जाणारे “पोलीस संचालक पदक” व “विशेष प्रशंसापत्र” हे श्री. संजय पांडे, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कडून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
सीसीटीएनएस प्रशिक्षक म्हणून त्यांची विशेष ख्याती असून त्यांनी महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, तुर्ची, नानवीज, जालना, खंडाळा इ. पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या पोलीस प्रशिक्षणार्थी तसेच पोलीस दलांत १०-२० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पोलीस अंमलदर यांचे प्रोफेशनल स्किल अपग्रेडेशन, पोलीस स्टेशन मॅनेजमेंट प्रशिक्षण संत्रांमध्ये प्रशिक्षण घेणारे अंमलदार तसेच महारा महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक ते पालीस उपअधिक्षक व परिवेक्षाधिन पोलीस अधिक्षक (IPS) दर्जाचे वरिष्ठ अधिकारी यांना सीसीटीएनएस, गुन्हे प्रतिबंध व गुन्हे प्रकटीकरणाकरीता केंद्रीय गुन्हे अभिलेख केंद्र, दिल्ली व केंद्रीय गृह विभागाकडून उपलब्ध करून दिलेल्या विविध पोर्टल्सचा प्रभावी वापर या विषयांवर सखोल प्रशिक्षण देत आहेत.
पोलीस दलातील तनावपूर्ण कामकाजा व्यतिरिक्त त्यांनी सोलापूर, सातारा, लोनावळा, टाटा मुंबई मॅरेथॉन इ. मध्ये भाग घेवून २१ किमी च्या हाफ मॅरेथॉन पूर्ण केलेल्या आहेत तसेच त्यांना सायकलिंगची विशेष आवड असून सायकल लव्हर्स गृप च्या माध्यमातून त्यानी सोलापूर सायक्लोथॉन, डुअॅथेलॉन स्पर्धा व दैनंदीन सायकलींग करून ३००० किमी पेक्षा जास्त प्रवास पूर्ण करून निरोगी जिवनशैली जपलेली आहे. रनिंग व सायकलिंग हा विशेष छंद त्यांनी जोपासलेला असून विदेशात सुद्धा कामाव्यतिरिक्त सायकलिंग करणे हा त्यांचा मानस आहे.
इकबाल शेख यांची कामगिरी उत्कृष्ठ होतीच दरम्यान विदेश मंत्रालय, दिल्ली येथे अति वरिष्ठ अधिकारी यांचेकडून त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी अत्यंत प्रभाविपणे व उत्तमरित्या दिलेल्या मुलाखतीमुळे विदेश मंत्रायलयाकडून दखल घेत विशेष प्रशिक्षण व विदेशातील सेवेची संधी त्यांना प्रदान केली आहे. त्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विरेश प्रभू, तत्कालीन पोलीस अधिक्षक शिरीष सरदेषपांडे, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, पोलीस उपअधिक्षक (गृह) विजया कुर्री, पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे सीसीटीएनएस, सुरेश निंबाळकर गुन्हे शाखा, सहकारी अंमलदार फिरोज तांबोळी, संजय सावळे, स्वप्निल सन्नके, निलेश रोंगे, अभिजित कांबळे तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व मित्र परिवारांकडून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com