सोलापूर ग्रामीण एल. सी. बी. ची अवैध वाळू उपशावर धडाकेबाज कामगिरी…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सोलापूर: मौजे कदमवाडी ता. माळशिरस जिल्हा सोलापूर येथील नांदवी ओढयातून अवैध वाळू उपशावर कारवाई ०२. जे.सी.बी., ०२ ट्रॅक्टरहेड, ०२ डम्पींग ट्रॉली वाळू चाळणी, २ ब्रास वाळूसह एकूण ५७ लाख १६ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करीत असताना पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे कदमवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर गांवचे नांदवी ओढयातून काही इसम जे.सी.बी. व ट्रॅक्टर ट्रॉली च्या सहाय्याने शासनाची परवानगी व रॉयल्टी नसताना चोरून वाळू काढत आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री. शैलेश खेडकर व त्यांचे पथकास कारवाई करण्याकरीता आदेश दिले.

त्यावरून पोलीस उपनिरीक्षक श्री. शैलेश खेडकर व त्यांचे पथक मौजे कदमवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर येथे जावून बातमी प्रमाणे खात्री केली असता, मौजे कदमवाडी गांवातील ओढयालगत असलेल्या शेतामध्ये जे.सी.बी.च्या सहाय्याने दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यामध्ये वाळू चाळण्याची चाळणी लावून काही इसम हे जे.सी.बी.च्या सहायाने वाळू भरत असताना दिसून आले. लागलीच सदर ठिकाणी २ जे.सी.बी, २ ट्रॅक्टरहेड, ०२ डम्पींग ट्रॉली वाळू चाळणीसह एकूण ०४ इसमांना जागीच पकडले व ०२ इसम पळून गेले. पकडलेल्या इसमांच्या कब्जातून २ जे.सी.बी., २ ट्रॅक्टरहेड, ०२ डम्पींग ट्रॉली वाळू चाळणीसह, दोन्ही ट्रॉलीमध्ये प्रत्येकी ०१ ब्रास वाळू असे एकूण ५७ लाख १६ हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. व एकूण ७ आरोपीतां विरूध्द नातेपुते पोलीस ठाणे गुरनं १६९ / २०२३ भादविकाक ३७९, ३४ तसेच गौण खनिज कायदा १९७८ चे कलम ४ (१), ४ (क), (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार धनाजी गाडे, आसिफ शेख, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट