सोलापूर पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना आज ‘नवभारत गव्हर्नन्स पुरस्कार

सोलापूर : शनिवार दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी सोलापूरच्या डॅशिंग पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांना आज ‘नवभारत गव्हर्नर अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये राज्यपाल श्री.भगतसिंग कोशारी यांच्या उपस्थितीत पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अतिशय उत्तम काम केले. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते या कोरोना बाधित झाल्या. मात्र ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे त्यांनी शासकीय सेवा सुरूच ठेवली होती. सोलापूर जिल्ह्यात काम करताना पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ने अनेकांना अवैध धंद्यांपासून दूर करून चांगल्या व्यवसायाकडे वळवले आहे आणि याची चर्चा संपुर्ण महाराष्ट्रात आहे.
सोलापूर ग्रामीण भागातील गुन्हेगारीच्या घटना कमी व्हाव्यात, चोरी, दरोडे होऊ नयेत, गावागावांमध्ये नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी पोलिस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली असून याची दखल घेऊन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना ‘नवभारत गव्हर्नर अवॉर्ड’ने आज सन्मानित करण्यात येणार आहे त्याच्या या कार्याला सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे सलाम…!
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com