घाटकोपर येथे समाजसेवक सुरेश रेवणकर पच्छिम बंगाल येथील मानाचा विर बिरसा मुंडा अंतरराष्ट्रीय रक्तक्रांती अवॉर्ड ने सन्मानीत…

0
Spread the love

मुंबई:

उपसंपादक-रणजित मस्के

कालचिनी न्यु अलीपुरद्वार (पश्चिम बंगाल) कालचिनी येथे आयोजित विर बिरसा मुंडा अंतरराष्ट्रीय रक्तक्रांती सम्मान समारोहचे आयोजन करण्यात आले होते. या सम्मान समारोह मध्ये हाँगकाँग, नेपाल, भूतान, ताईवान, मालदीव, नागालँड, सह भारत देशातील विभिन्न राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक संस्थाचा सम्मान करण्यात आला.
या रक्तक्रांती समारोह मध्ये निराधार सेवा केंद्र भिवंडी अनाथ आश्रम आणि रक्तदानाचे क्षेत्रात स्वतः 158 वेळा रक्तदान करून उल्लेखनीय कार्य केल्या बद्धल घाटकोपर मुंबई येथील शतक वीर रक्तदाता निराधार सेवा केंद्राच्या माध्यमातून 48 अनाथ मुलांची सेवा , रक्तदान व इतर सामाजिक कार्याची दखल घेऊन दुआर्स रक्तमित्र परिवार तर्फे दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी सुरेश प्रभाकर रेवणकर ह्यांचा सत्कार सी आय डी ऑफिसर संजुकता चटर्जी, कारगिल योद्धा मेजर दलजीत सिंग, सम्मान समारोहचे संयोजक रंजीत मिश्रा यांच्या हस्ते मेडल शिल्ड प्रमाणपत्र दुपट्टा देऊन भव्य सत्कार करण्यात आला. पश्चिम बंगाल येथे रक्तदान शिबिरा मध्ये तसेच रक्तदान महादान रैलीत सहभाग घेऊन भारत माता की जय, वंदेमातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय महाराष्ट्रचा जयघोष देत नागरिकां मध्ये जनजागृती केली या रैली मध्ये विदेश सह भारत देशातील प्रत्येक राज्यातील शेकडो सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट