समाज सेवक श्री. सुरेश रेवनकर हे हेल्प फाॅर नीडी फाऊंडेशन आयोजित नॅशनल सेव्ह ह्युमॅनिटी अवॉर्डने सन्मानित…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पंजाब-भाटिंडा:– दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी हेल्प फॉर नीडी फाउंडेशन भतींडां पंजाब च्या माध्यामतून नॅशनल सेव्ह द हुमेनिटी अवॉर्ड सेरेमनी २०२३ पंजाब मधील भोजराज जैन हाई स्कूल मानसा रोड भटिनडा इथे भारतातील सर्व राज्यातून निवडलेल्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यां मध्ये श्री सुरेश रेवनकर यांना समाजसेवा आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना रक्त व पांढरा पेशी उपलब्ध करून , तसेच स्वतः 155 वा रक्तदान (109 वेळा रक्तदान आणि 46 वेळा पांढऱ्या पेशी दान) केल्याबद्दल तसेच निराधार सेवा केंद्र ह्या भिवंडी चा माध्यमातून किमान 48 मुलांचे संगोपन करत असल्याबद्दल नॅशनल सेव्ह द हुम्यानिटी अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.

पंजाब चे डीसीपी आणि एम पी साहेबांनी सन्मान पत्र मेडल घालून सन्मानीत करण्यात आले.

हे अवॉर्ड मी माझ्या जन्मदात्या आई वडील, हितचिंतक व सहकाऱ्यांना तसेच रक्तदान करणाऱ्या मित्रांना अर्पण करत आहे असे मत यावेळी समाज सेवक श्री सुरेश रेवनकर यांनी मांडले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट