सांताक्रूझ डेपो मध्ये मोबाईल, पैसे व कागद पत्रांची विसरलेली बॅग समाज सेवक श्री. सुरेश रेवणकर यांनी केली परत…

उपसंपादक-रणजित मस्के
सांताक्रूझ :-दिनांक 3.09.2024 रोजी मी सांताक्रुझला कामा निमित्त जात असताना एक बॅग सांताक्रूझ बस डेपो मध्ये कुणी विसरून गेलेले लक्षात आले, मी सहज कुतुहल म्हणून ती बॅग ताब्यात घेतलं आणि पहिके आता त्या बॅग मध्ये लहान मुलाचे कपडे, पैश्याचे पाकीट, त्यामध्ये सात हजार तीनशे चे जवळ रोख रक्कम , आधार कार्ड, आणि इतर कागद पत्र पाण्याचे बाटल्या खाण्याचे वस्तू आणि एक ओप्पो कंपनी 30,000 हजार किमतीचे एक नुकतेच घेतलेले नवीन मोबाईल आडळून आले मी ते फोन घेवून एखाद्याचे नंबर शोधण्याचे प्रयत्न करताना समोरून ज्योती मोरे नावाचे महिलेचा व्हॉईस कॉल आला ,आणि तिने मोबाईल तिचे असल्याचे सांगितले, आणि ते सर्व परिवार पार्ले बीच वर फिरायलां गेले होते आणि सांताक्रूझ वरून घराकडे येताना घाई गडबडीत बॅग बस डेपो वर विसरल्याचे सर्व हकीकत सांगितले, मी त्यांना सांताक्रूझ पोलिस ठाण्यात बोलावले आणि सांताक्रूझ ला राहणारे सौ. कामाक्षी शेट हीला बोलावून घेतले, ज्योती मोरे ह्या महिलेने स्वतःचा भाऊ अविनाश ला पाठवले मी तेथील ऑन ड्युटी महिला पोलिस निरीक्षक ला सविस्तर माहिती देवून त्यांचा आणि संपूर्ण स्टाफ देखत सापडलेले बॅग आणि मोबाईल अविनाश ज्योती मोरे हिच्या भावाचा स्वाधीन केले.

आणि वाकोला पोलिस स्टेशन चे सर्व स्टाफ ने माझे आणि कामाक्षी शेट चे कामाचे कौतुक केले. आणि आमचा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.अशी माहीती श्री सुरेश रेवणकर यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com