सामाजिक कार्यकर्ता श्री. जमीर माखजनकर यांच्या नवीन नालासोपारा ते मंडणगड एसटी सेवा मागणीला यश..

संपादिका – दिप्ती भोगल
नालासोपारा :– मा.श्री जमीर माखजनकर यांच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नाने व विभागातील सर्व प्रवाशांच्या आशिर्वादाने त्यांनी दिलेला शब्द आता पुर्ण होणार आहे.
मंडणगड ,कोंडगाव, दंडनगरी, पणदेरी ,पेवे, म्हाप्रळ ,आंबेत, दाभोळ, टोळ फाटा मार्गे ,लोणेरे, माणगाव, पनवेल, सायन ,बोरीवली व नालासोपारा नवीन एसटी सेवा सुरू होत आहे.
तरी प्रवाशांनी सदर एसटी सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री. जमीर माखजनकर, सामाजिक कार्यकर्ता व सचिव- रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केली आहे.
सदर एसटी मंडणगड हून सुटण्याची वेळ सकाळी 07:30 वाजता. मंडणगड ते कोंडगाव पणदेरी नालासोपरा मार्गे व रात्री ०९ : ३० वाजता नालासोपरा हून पणदेरी कोंडगाव मंडणगड मार्गे दिनांक २२ मार्च २०२४ पासून आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सुरू होत आहे.
प्रवाशांना सुचना आहे की, गाडी ला चांगला प्रतिसाद मिळाला तर गाडी कायमस्वरूपी करण्यात येईल. तरी आपल्या सर्वांचे सहकार्य मिळावे अशी कळकळीची विनंती व धन्यवाद श्री जमीर माखजनकर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com