सामाजिक क्षेत्रातील अनुकरणीय कार्यासाठी पोस्को महाराष्ट्र स्टीलचा रोटरीतर्फे सन्मान….

प्रतिनिधी:-सचिन पवार
माणगांव रायगड


माणगांव :-स्टील उद्योग क्षेत्रात आघाडीचे नाव असलेल्या पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीला शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल “रोटरी सीएसआर पुरस्कार २०२५” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रोटरी इंटरनॅशनल डीस्ट्रीक्ट ३१३१ (रायगड आणि पुणे जिल्हा) ने आयोजित केलेला रोटरी सीएसआर पुरस्कार २०२५ समारंभ १८ एप्रिल २०२५ रोजी पुणे येथील हयात रीजन्सी येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कंपन्यांना सन्मानित करण्यात आले.माणगांव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, महिला सक्षमीकरण तसेच इतर कल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवत असते तसेच आसपासच्या परीसातील स्थानिक लोकांचे जीवनमान उचंविण्यावर आणि सक्षमीकरण करण्यावर नेहमीच भर दिला आहे.
कंपनी मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळांच्या मुलभूत सुविधांचा विकास व गुणवत्ता सुधारणा, शाळांमध्ये सिस्टरहूड रिलेशनशिप प्रकल्प, विज्ञान संच वाटप, शाळांमध्ये ई-लर्निंग चा सेट-अप, संगणक संच वाटप, विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी बस ची व्यवस्था, उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असे विविध उपक्रम राबविले जातात.पोस्को कंपनी शिक्षण क्षेत्रामध्ये करत असलेल्या उपक्रमांचे निवड समितीने कौतुक केले. हा पुरस्कार केवळ आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीचीच कबुली देत नाही तर एक चांगली सामाजिक चळवळ निर्माण करण्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतो, अशी भावना यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.