एम.एच.बी.काॅलनी पोलीसांनी मुंबई शहरात येणारा १५ लाख ८९ हजार रुपयाचा भेसळयुक्त गुटखा केला हस्तगत…

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली :
एम.एच.बी.काॅलनी पोलीसांनी मुंबई शहरात येणा-या 15.89 लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित भेसळयुक्त गुटखा व 8 लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा अंदाजे 25 लाख किमतीची मालमत्ता हस्तगत करून केली अति उल्लेखनीय कामगिरी.
CR 526/1023, Us 328,188,179,272,273,34 IPC rw Rule 26(2)(i),27(3)(d)27(3)(c) Food Safety Rule
सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 07/10/2023 रोजी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सुर्यकांत पवार व पथक हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की, टेम्पो क्रं MH 48 CB 5613 या टेम्पो मधून प्रतिबंधित गुटखा साठा करून मुंबई शहरांमध्ये विक्री करण्याकरता येणार आहे.


त्यावरून माननीय वरिष्ठांना सदर बाबत माहिती देऊन प्रमिलानगर, नॅचरल आईस्क्रीम समोर, दहिसर पश्चिम,मुंबई येथे सापळा रचला असता सदर टेम्पो पकडण्यात आला.
नमूद टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये खालील नमूद प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे वर्णन:-
1) विमल पान मसाला (बडा) 7 बॉक्स किं अं रु 3,29,000/-
2) विमल पान मसाला ( साडे आठ) 10 गोणी किं अं रु 3,88,000/-
3) विमल पान मसाला (किंग) 20 गोणी किं अं रु 8,71,200/-
‐————————————–
एकुण कि.अं.रु 15,89,160/-
(पंधरा लाख एकोणनव्वद हजार एकशे साठ)
गुन्ह्यात वापरलेले वाहन –
टाटा इंट्रा MH 48 CB 5613
कि.अं.रु 8,50,000/-

अटक आरोपी नाव व पत्ता:-
1) रंजन कुमार राम मदन सहानी वय 29 वर्षे,व्यवसाय -चालक, रा.ठि- कसिडी गाव, चौपाटी, धाब्याच्या बाजूला, चामुंडा सर्कल, भिवंडी, जिल्हा ठाणे
गुन्हे अभिलेख:-
1) बचीवारा पोलीस ठाणे बेगूसराय, बिहार
गुन्हा नोंद क्रमांक 123/2017, कलम 304 (ब), 201,34 भादवी
2) काशिमिरा पोलीस ठाणे
गुन्हा नोंद क्रमांक 188/2015, कलम 58,59 कमोडिटी ऍक्ट
3) काशीमिरा पोलीस ठाणे 122/ 2016,कलम 188,324, 506,34 भादवी
पाहिजे आरोपी :-
1) शौकत काशिमिरा
2) दिपक गोरेगाव
3) फैसल कांदिवली
तपास पथक:-
सपोनि सुर्यकांत पवार
पो.ह.क्रं 961381/शिंदे
पो.शि.क्रं 149349/मोरे
पो.शि.क्र. 111518/ सवळी यांनी हि कारवाई केली असल्याची माहिती श्री. सुधीर कुडाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम.एच.बी काॅलनी पोलीस ठाणे,मुंबई यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com